आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'वजह तुम हो'च्या पोस्टरवर सलमानच्या 'हीरोईन'चा Bold अवतार, पाहा 22 फिल्म्सचे बोल्ड पोस्टर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'हेट स्टोरी 2' आणि 'हेट स्टोरी 3' या सिनेमांनंतर दिग्दर्शक विशाल पांड्या यांच्या आगामी 'वजह तुम हो' या सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे ट्रेलर आणि पोस्टर्स अलीकडच्या काळात रिलीज झाले असून त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगतेय. याचे कारण आहे अभिनेत्री सना खान. सिनेमाच्या पोस्टर आणि ट्रेलरमध्ये सनाने सर्व मर्यादा ओलांडत अफलातून बोल्डनेस दाखवला आहे. सलमान खानच्या 'जय हो' या सिनेमात सना यापूर्वी दिसली आहे. हा सिनेमा 2 डिसेंबरला रिलाज होणार आहे. या सिनेमात थ्रिलर, लव, सेक्स आणि भरपूर रोमान्स आहे. अगदी त्याच बरोबर यामध्ये भरभरून अॅक्शन देखील आहे. या सिनेमात शर्मन जोशी एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमातून 'बिग बॉस' फेम आणि सलमान खानची चाहती सना खानला लीड रोल साकारण्याची संधी मिळाली आहे. सना खानचा सेक्सी अंदाज ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता गुरमीत चौधरीसुद्धा या सिनेमात झळकणारेय. शिवाय रजनीश दुग्गल देखील यात आहे. आता सनाच्या बोल्डनेसचा फायदा सिनेमा होणार का, हे बघणे इंट्रेस्टिंग ठरणारेय.
बोल्ड पोस्टर्स बनलाय ट्रेंड....
तसे पाहता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक फार पूर्वीपासून बोल्ड पोस्टर्सची मदत घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा वादांनाही तोंड फुटले आहे. ‘3 जी’, ‘हेट स्टोरी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘जोड़ी ब्रेकर्स’, ‘जिस्म 2’, ‘मर्डर 2’, ‘साहिब बीवी और गँगस्टर’, ‘काइट्स’, ‘राज’, ‘कुर्बान’, ‘आशिक बनाया आपने’, ‘ब्लड मनी’, ‘द डर्टी बॉलिवूड बॅचलर’, ‘हैलो...कौन है’, ‘हीरोइन’, ‘हिस्स’, ‘इंकार’, ‘जूली’, ‘मरेगा साला’, ‘रागिनी MMS 2’, ‘मर्डर 3’, ‘नशा’, ‘निशब्द’, ‘प्लेयर्स’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘राज 3’, ‘रेड’, ‘कौन है वहां’ यांसारख्या सिनेमांचे पोस्टर्स बरेच बोल्ड बनवण्यात आले होते. काही सिनेमांचा अपवाद वगळता बोल्ड पोस्टर्स सिनेमा हिट करण्यात अयशस्वी ठरले होते.
खरं तर पूर्वीच्या काळी ए ग्रेड सिनेमांचे पोस्टर्स बोल्ड असायचे. मात्र आता बॉलिवूडमधील सामान्य सिनेमांचेही पोस्टर्स बोल्ड दिसू लागले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही बोल्ड पोस्टर असलेल्या सिनेमांविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या बोल्ड पोस्टर्स असलेल्या सिनेमांविषयी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...