आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : \'ज्युली 2\'च नव्हे, हेदेखील आहेत बॉलिवूडच्या 23 फिल्म्सचे बोल्ड पोस्टर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

70 च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘ज्युली’ चित्रपट आठवतोय का? त्या काळात बोल्ड चित्रपटाची संकल्पना सुरु झाली ती याच चित्रपटामुळे. त्यानंतर काही वर्षांपूर्वीच नेहा धुपियाने ‘ज्युली’ हा चित्रपट केला. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘ज्युली 2’ हा चित्रपट आज (24 नोव्हेंबर) रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटात नेहा धुपियाऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी मुख्य भूमिकेत झळकली आहे. राय लक्ष्मी ही एकेकाळी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत आली होती. दिपक शिवदासानी दिग्दर्शित ‘ज्युली 2‘ हा चित्रपट यापूर्वी 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, पण काही कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. अखेर आज हा चित्रपट रिलीज झाला असून यामध्ये राय लक्ष्मीने बरेच बोल्ड सीन्स दिले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे पोस्टरसुद्धा खूप बोल्ड आहे. पोस्टरवर राय लक्ष्मी बिकिनीत बीच किनारी झोपलेली दिसतेय. आता या बोल्डनेसचा फायदा राय लक्ष्मीला आगामी काळात होणार का, हे लवकरच कळेल. 


बोल्ड पोस्टर्स बनला आहे बॉलिवूडचा ट्रेंड....  
तसे पाहता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक फार पूर्वीपासून बोल्ड पोस्टर्सची मदत घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा वादांनाही तोंड फुटले आहे. ‘3 जी’, ‘हेट स्टोरी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘जोड़ी ब्रेकर्स’, ‘जिस्म 2’, ‘मर्डर 2’, ‘साहिब बीवी और गँगस्टर’, ‘काइट्स’, ‘राज’, ‘कुर्बान’, ‘आशिक बनाया आपने’, ‘ब्लड मनी’, ‘द डर्टी बॉलिवूड बॅचलर’, ‘हैलो...कौन है’, ‘हीरोइन’, ‘हिस्स’, ‘इंकार’, ‘जूली’, ‘मरेगा साला’, ‘रागिनी MMS 2’, ‘मर्डर 3’, ‘नशा’, ‘निशब्द’, ‘प्लेयर्स’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘राज 3’, ‘रेड’, ‘कौन है वहां’ यांसारख्या सिनेमांचे पोस्टर्स बरेच बोल्ड बनवण्यात आले होते. काही सिनेमांचा अपवाद वगळता बोल्ड पोस्टर्स सिनेमा हिट करण्यात अयशस्वी ठरले होते.


खरं तर पूर्वीच्या काळी ए ग्रेड सिनेमांचे पोस्टर्स बोल्ड असायचे. मात्र आता बॉलिवूडमधील सामान्य सिनेमांचेही पोस्टर्स बोल्ड दिसू लागले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही बोल्ड पोस्टर असलेल्या सिनेमांविषयी सांगत आहोत.

 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या बोल्ड पोस्टर्स असलेल्या सिनेमांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...