Home »Gossip» Controversial Lovelife Of Anurag Kashyap

B'day : दोन लग्नं मोडली, आता 20 वर्षांनी लहान तरुणीला डेट करतोय हा डायरेक्टर

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 11:08 AM IST

  • (L)दुसरी पत्नी कल्की कोचलिनबरोबर अनुराग कश्यप. दुसऱ्या फोटोत गर्लफ्रेंड शुभ्रा शेट्टीबरोबर.
मुंबई -फिल्म डायरेक्टर, रायटर, प्रोड्युसर आणि अॅक्टर अनुराग कश्यप 10 सप्टेंबरला 45 वर्षांचा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये जन्मलेल्या अनुरागचे बालपण अनेक शहरांत गेले. त्यांनी ग्वाल्हेरमध्ये शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात अनुरागने ब्लॅक फ्रायडे, देव डी आणि गुलाल असे अनेक चित्रपट केले. पण त्यांना ओळख मिळाली 2012 मध्ये आलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' द्वारे.

दोन लग्नांत अपयश
- अनुराग कश्यप यांच्या खासगी जीवनाचा विचार करता, त्याने दोन लग्नं केली आहेत.
- त्याचे पहिले लग्न 2003 मध्ये आरती बजाजबरोबर झाले.
- आरती प्रसिद्ध फिल्म एडिटर आहे. तिने अनुरागचे अनेक चित्रपट एडिट केले आहे. पण 6 वर्षांनी हे नाते तुटले. दोघांना एक मुलगी आलिया कश्यपही आहे.
- पहिल्या घटस्फोटानंतर अनुरागने तेव्हा इंड्स्ट्रीत पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वतःपेक्षा 11 वर्षांची लहान अॅक्ट्रेस कल्की कोचलिनबरोबर 2011 मध्ये दुसरे लग्न केले.
- त्यांचे हे नातेही फारकाळ टिकले नाही. 2015 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.

23 वर्षांच्या तरुणीला करतोय डेट
- कल्कीपासून वेगळा झाल्यानंतर अनुरागचे नाव हुमा कुरेशीबरोबरही जोडले गेले.
- दोघांबाबत अनेकदिवस बातम्या आल्या. त्यानंतर 2016 मध्ये अनुरागच्या जीवनात शुभ्रा शेट्टीची एंट्री झाली.
- शुभ्रा अनुरागपेक्षा तब्बल 21 वर्षांनी छोटी आहे. अनुराग 45 तर ती 23 वर्षांची आहे.
- जून 2017 मध्ये अनुराग कश्यपनेही या नात्याला दुजोरा दिला. त्याने दोघांचे काही फोटो शेयर केले होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अनुराग कश्यपशी संबंधित काही बाबी आणि पाहा PHOTOS...

Next Article

Recommended