आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bold फोटोशूट ते लिव्ह इनपर्यंत, बर्थडे गर्ल वीणा मलिकच्या Top कॉन्ट्रोव्हर्सीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिनेसृष्टीत नाव आणि पैसा कमावणे तसे कठीणच. विशेषतः बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कलाकाराला विशेष मेहनत घ्यावी लागते. अभिनयाच्या बळावर फार कमी जण हीरो-हिरोईनच्या पदापर्यंत पोहोचू शकतात. मात्र ज्या अभिनेत्रींना प्रसिद्ध मिळू शकत नाही, त्या अंगप्रदर्शनाच्या माध्यमातून चर्चेत येण्याचा प्रयत्न करु लागतात.

वीणा मलिक असेच एक नाव आहे, जिने पाकिस्तानातून भारतात येऊन बॉलिवूडमध्ये काहीशी अशाच प्रकारे आपली ओळख निर्माण केली. वीणाने अद्याप एकाही बिग बजेट किंवा बिग बॅनरच्या सिनेमात काम केले नाही. मात्र अंगप्रदर्शन असो किंवा एखाद्या वादात अडकणे असो, नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहून तिने भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे तिला ओळखत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.

वीणा मलिकने आज (26 फेब्रुवारी) आपल्या वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 फेब्रुवारी 1984 रोजी पाकिस्तानच्या रावलपिंडीत वीणाचा जन्म झाला होता. मॉडेलिंगपासून ते अभिनयापर्यंत ज्या क्षेत्रात वीणाने पदार्पण केले. तेथे तिने प्रत्येक वेळी नवीन वाद निर्माण केला. वादग्रस्त वक्तव्य आणि न्यूड फोटोशूटमुळेसुद्धा ती नेहमीच चर्चेत असते. वीणाचे नाव क्रिकेट फिक्सिंगमध्येही अडकले आहे. त्यामुळे वीणाला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनसुद्धा म्हटले जाते. अलीकडेच म्हणजे 25 डिसेंबर 2013 रोजी वीणाने दुबईस्थित व्यावसायिक असद बशीर खानसोबत लग्न करुन फिल्मी दुनियेला रामराम ठोकला आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वीणा आता आपल्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.  
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या वीणाच्या खात्यात कोणकोणते वाद जमा आहेत...
बातम्या आणखी आहेत...