आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर दिसतेय \'बाहुबली\'ची Craze, शेअर होतायेत फनी Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या भव्य-दिव्य 'बाहुबली' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. पहिल्या पाच दिवसांतच 'बाहुबली'चा 200 कोटी क्लबमध्ये समावेश झाला आहे. सर्वाधिक वेगाने 200 कोटींचा आकडा पार करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे. याशिवाय दक्षिण भारतात 'बाहुबली' ब्लॉकबस्टर होण्याचा मान मिळवला आहे. 'बाहुबली' हा सिनेमा एकाचवेळी पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. तेलगू आणि तामिळ भाषांमध्ये या सिनेमाचं चित्रिकरण झालं आहे. तर हिंदी, मल्याळम आणि फ्रेंच भाषांमध्ये त्याचं डबिंग केलं आहे.
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. हा सिनेमा पूर्ण होण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागली. चित्रपटामध्ये प्रभास, राणा डुग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या सिनेमाची सोशल मीडियावरसुद्धा क्रेझ बघायला मिळत आहे. चाहत्यांनी या सिनेमाचे फनी फोटोज सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांना मोठ्या संख्येने लाइक्स मिळत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोशल मीडियावरील 'बाहुबली'ची क्रेझ...