आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपटूंबरोबर होते या अभिनेत्रींचे अफेअर, पण जास्त काळ टिकले नाही नाते..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'चक दे गर्ल' सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांनी नुकतेच त्यांचे नाते जगजाहिर केले आहे.सागरिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती रिंग सोबत दिसून येत आहे. आता चाहत्यांना यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. असे म्हटले जात आहे की, हे दोघे या वर्षाच्या अखेरीस विवाहबंधनात अडकतील. कॉमन फ्रेंड अंगद बेदीने या दोघांची भेट घडविली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली, प्रेम जुळले आणि आता दोघे लग्न करण्याच्या तयारीत आहेत. 
 
पण सर्वच कपलसोबत असे घडत नाही. बी टाऊनमधील अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांनी क्रिकेटपटूंना डेट केले पण त्यांचा अखेर ब्रेकअपमध्ये झाला. यात अमृता सिंह-रवि शास्त्री, अजहर -संगीता बिजलानी आणि किम शर्मा-युवराज सिंह यांचा समावेश आहे. हेच नव्हे अजूनही काही जोड्या आहेत ज्या जुळल्यानंतर तुटल्या आहेत.  
 
अमृता सिंह-रवी शास्त्री 

सैफ अली खानची पूर्व पत्नी अमृता आणि रवी शास्त्रीचे अफेअर त्यावेळी फार चर्चेत आले होते. 80 च्या दशकात दोघेदी करिअरची अनेक शिखरे गाठत होते. रवी शास्त्रीला पाहण्यासाठी अमृता नेहमी स्टेडियममध्ये दिसून यायची. पण सर्वांसमोर कधीही नात्याची कबुली न देता दोघांनी ब्रेकअप केले. 
 
ईशा शरवानी आणि झहीर खान 

अभिनेत्री ईशा शरवानी आणि झहीर खान यांचे अफेअरही तब्बल 8 वर्षानंतर संपुष्टात आले. दोघांना अनेकवेळा सोबत पाहण्यात आले होते. अशाही बातम्या समोर आल्या होत्या की ईशा आणि जहीर लवकरच लग्न करणार आहेत. पण तसे झाले नाही. दोघांचे ब्रेकअप का झाले, यावर काहीच माहिती उपलब्ध नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अजून काही अभिनेत्री आणि क्रिकेटर ज्यांचे झाले ब्रेकअप 
बातम्या आणखी आहेत...