आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Home: प्रभुदेवाने दिले आपल्या आशियानाला नवे रुप, बघा ड्रीम होमची खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सेलिब्रिटींची आलिशान घरं ही सर्वसामान्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा भाग राहिली आहेत. सेलिब्रिटींच्या आलिशान घरांची झलक क्वचितच चाहत्यांना बघायला मिळत असते. प्रत्यक्षात त्यांचे घर कसे असते, ते कसे राहतात याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून असते. प्रसिद्ध अभिनेता, डान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माता प्रभुदेवाबद्दल जाणून घेणे कुणाला आवडणार नाही? प्रभुदेवा हा भारतीय सिनेइंडस्ट्रीतील एक वेगळेपण जपलेला डान्सिंग स्टार आहे. अलीकडेच प्रभूदेवाने आपल्या घराचे ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलंय. यासाठी त्याने गोदरेज इंटेरिओची मदत घेतली आहे.
प्रभूदेवाच्या साध्या घराला आता मॉर्डन देण्यात आला आहे. संपूर्ण घराचे इंटेरिअर बदलण्यातच आले आहे. यासाठी त्याने आपल्या आईवडिलांना हव्या तशा गोष्टी घरात करुन घेतल्या आहेत. त्यामुळे त्याचे आईवडीलसुद्धा खूप आनंदी आहे. शिवाय स्वतः प्रभूदेवासुद्धा घराला मिळालेले नवेपण बघून समाधानी आहे. गोदरेज इंटेरिओने प्रभूदेवाच्या घराचे ट्रान्सफॉर्मेशन होतानाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर रिलीज केला आहे. यामध्ये त्याच्या सुंदर आणि प्रशस्त घराची झलक बघायला मिळते.
या डान्सिंग स्टारच्या घराची लेटेस्ट छायाचित्रे आणि व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग कसे आहे डान्सिंग सुपरस्टारचे घर बघा छायाचित्रांमध्ये आणि शेवटच्या स्लाईडमध्ये बघा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...