आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअलमध्ये असे आहे 'दंगल' गर्ल गीता फोगाटचे घर, बघा INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चरखी दादरी/पानीपतः 'दंगल' या सिनेमाने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. पैलवान महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाचे शूटिंग पंजाबच्या गुज्जरवाल गावात झाले आहे. एका जुन्या हवेलीला सिनेमात महावीर फोगाट यांचे घर दाखवले आहे. या रिपोर्टमधून divyamarathi.com वाचकांना दाखवत आहे, महावीर फोगाट यांचे खरे घर आणि गाव. 

वाचा गीता-बबिताच्या गावाशी निगडीत खास गोष्टी...   
- सिनेमात महावीर फोगाट शेतात आखाडा तयार करुन त्यांच्या मुलींना ट्रेनिंग देत अशल्याचे दाखवले आहे. मात्र महावीर फोगाट यांनी त्यांच्या घरीत आखाडा बनवून गीता आणि बबिता यांना रेसलिंगचे ट्रेनिंग दिले होते.  
- आता त्याच ठिकाणी एक प्रोफेशन रेसलिंग हॉल बनवण्यात आला आहे. या हॉलमध्ये रेसलिंग मॅट टाकण्यात आली असून एक अत्याधुनिक जीम सुरु करण्यात आली आहे. येथे मुलांना रेसलिंगचे धडे दिले जातात.  
- या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.  

 40 मुले करतात रेसलिंगची प्रॅक्टिस
- महाबीर फोगाट यांनी तयार केलेल्या या हॉलमध्ये दररोज 40 मुले रेसलिंगचे धडे गिरवतात.  
- येथे गावातील आणि तेथील जवळपासच्या गावातील मुले रेसलिंग शिकायला येतात.  
- महावीर या सर्व मुलांना फ्रीमध्ये रेसलिंगचे धडे देतात. यामध्ये अशाही मुलांचा समावेश आहे, ज्यांचे आईवडील पुर्वी महावीर फोगाट यांना टोमणे मारायचे.  
सकाळी चार वाजल्यापासून सुरु होते प्रॅक्टिस
- या रेसलिंग हॉलमध्ये सकाळी चार वाजेपासून प्रॅक्टिस सुरु होते. ती सकाळी सात वाजेपर्यंत सुरु असते.  
- त्यानंतर संध्याकाळी 4 ते 7.30  वाजेपर्यंत प्रॅक्टिस सेशन चालतेय  

आता जुन्या घराच्या ठिकाणीच बनवण्यात आले आहे नवीन घर...  
- महावीर फोगाट यांनी जुन्या घराचे पुननिर्माण केले आहे.   
- आताही महावीर गावातच वास्तव्याल आहेत. तर त्यांचे भाऊ शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. महावीर यांनी मात्र त्यांचे गाव सोडले नाही.  
- गावात त्यांचा खूप आदर केला जातो. ते गावक-यांसाठी आदर्श ठरले आहेत.  
 
सर्व फोटोः जगदीप सिंह, चरखी दादरी

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ज्यांच्या आयुष्यावर 'दंगल' सिनेमा तयार झाला आहे, त्या महावीर फोगाट यांच्या घराची खास छायाचित्रे...   
बातम्या आणखी आहेत...