आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर या कारणामुळे दारा सिंह-मुमताजचे प्रेम राहीले अपूर्ण, दोघांनी सोबत केले होते 16 चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई - दारा सिंह यांचे नाव केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात फेमस होते. उत्तम अभिनेता ते प्रोफेशन कुस्तीपटू आणि राजकारणी अशा सर्वच भूमिका त्यांनी चोख निभावल्या. 2012 साली वयाच्या 83 व्या वर्षी दारा सिंह यांचे निधन झाले होते. पण चित्रपटांत एकाहून एक उत्तम रोल करणारे दारासिंह आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. 
 
दारा सिंह यांनी त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1952 साली केली होती. त्यांनी अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटात काम केले होते. अभिनेतासोबतच त्यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही काम पाहिले. त्यांनी टीव्हीवरही काम केले होते. दारा सिंह यांना सर्वात पहिले 'बजरंगी' तील हनुमानच्या भूमिकेने मिळाली होती. 

हनुमानाच्या भूमिकेने मिळाली प्रसिद्धी..
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतही ते हनुमान बनले होते. हनुमानच्या भूमिकेने ते रातोरात स्टार झाले होते. दारा सिंह यांचा जन्म अमृतसर येथे झाला होता. लहानपणापासून त्यांना पहलवानीचा शौक होता.  1947 साली ते रेस्लिंगचे ट्रेनिंग घेण्यासाठी सिंगापूरला गेले होते. तेथे जाऊन त्यांनी रेस्लर हरमन सिंह यांच्याकडून ट्रेनिंग घेतले. केवळ 18 वर्षाचे असताना त्यांची उंची 6 फुट 2 इंच होती आणि वजन 127 किलो होते. दारासिंह यांना पाहूनच कोणीही इम्प्रेस होत असे. 1954 साली त्यांनी 'रुस्तम-ए-हिंद' रेस्लिंग केली. यावेळी त्यांनी रेस्लर टाइगर जोगिंदर सिंह यांना हरवले आणि महाराजा हरि सिंह यांनी त्यांना सिल्वर मेडल दिले. 1983 साली त्यांनी कुस्तीतून रिटायरमेंट घेतली त्यांचे फिल्मी करिअर 1952 सालीच सुरु झाले होते. 
 
अॅक्शन हिरो म्हणून केली करीअरची सुरुवात..
दारा सिंह यांनी सर्वप्रथम 'संगदिल' चित्रपटात काम केले होते. त्यात त्यांनी अॅक्शन हिरोची भूमिका केली होती. दारा सिंह यांनी मुमताज यांच्यासोबत जवळपास 16 चित्रपटात सोबत काम केले होते. त्यांनी अनेक बी ग्रेड चित्रपटात काम केले होते. त्यावेळी ते बी ग्रेड चित्रपटांसाठी 4 लाख रुपये घेत. जब वी मेट हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

बॉलिवूडने मुमताजला माझ्याकडून हिसकावले..
दारा सिंह आणि मुमताज दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. मुमताज यांच्या बहिणीचे लग्न दारा सिंह यांच्या भावासोबत झाले आहे. पण जसेजसे मुमताज हिट ठरत गेल्या. मुमताजची प्रसिद्धी इतकी वाढली की अखेर त्यांनी एकमेकांपासून वेगळे होणे योग्य समलजले.एका मुलाखतीत दारा सिंह यांनी मुमताज यांच्यापासून वेगळे होण्याचे दुःख व्यक्त केले होते. त्यावेळी त्यांनी 'बॉलीवुड ने मुमताज को मुझसे छीन लिया था' असे सांगितले.
 
केले होते दोन लग्न..
दारा सिंह यांच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर त्यांनी दोन लग्न केले होते. त्यांचे पहिले लग्न वयाच्या 14 व्या वर्षी झाले होते. जेव्हा दारा सिंह 16 वर्षाचे होते तेव्हा त्यांना एक मुलगाही होता. मुलाच्या जन्माच्या 6 महिन्यानंतरच बचनो कौर त्यांना सोडून गेली. यानंतर दारा सिंह यांनी 1961 साली सुरजित कौर यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी दारा सिंह वॉचमनची नोकरी करत होते. त्यांना 3 मुले आणि3 मुली आहेत. त्यातील एक आहेत बिंदू दारा सिंह.
विंदूने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की, शेवटच्या दिवसात दारा सिंह यांची तब्येत फार खराब झाली होती. स्वतःला ठिक करण्यासाठी ते कोणतेही औषध खात. त्यांना चालता तसेच झोपताही येत नसे. अशातच त्यांचे हार्ट अॅटॅक आणि ब्रेन हॅमरेजने निधन झाले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दारा सिंह यांचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...