आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरहिट DDLJ हे 5 फ्लॉप स्टार्स, फिल्मी करिअरमध्ये दाखवू शकले नाहीत कमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री मंदिरा बेदी)
अभिनेत्री मंदिरा बेदी आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे मंदिराचा जन्म झाला. मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून तिने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर सोफिया पॉलिटेक्निक मीडियातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मंदिराने आपल्या करिअरची सुरुवात 'शांती' या मालिकेद्वारे केली. या मालिकेनंतर तिने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
1995 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने शाहरुख खान आणि काजोलला स्टारपद बहाल केले. हा आदित्य चोप्राचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमाने काही लोकांचे करिअर यशोशिखरावर पोहोचवले, तर काही स्टार्सना मात्र या सिनेमाला मिळालेल्या यशाचा काहीच फायदा झाला नाही. यापैकी एक अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी.
मंदिराचा पहिलाच सिनेमा...
अभिनेत्री म्हणून मंदिराचा हा पहिलाच सिनेमा होता. यापूर्वी ती 'शांती' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. 'डीडीएलजे'मध्ये ती शाहरुख खानसोबत झळखली होती. मात्र सिनेमाला मिळालेल्या यशानंतर मंदिराला एकही सिनेमा मिळाला नाही. 43 वर्षीय मंदिरात टीव्ही शो आणि होस्ट म्हणून छोट्या पडद्यावर कार्यरत आहे. मात्र तिचे फिल्मी करिअर फ्लॉप राहिले. मंदिरासोबतच 'डीडीएलजे'मधील आणखी काही असे स्टार्स आहेत, त्यांचे फिल्मी करिअल फार चालले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या हिट सिनेमातील फ्लॉप ठरलेल्या कलाकारांविषयी...