आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहस्यमयरित्या मिळाला होता सिल्क स्मिताचा मृतदेह, अशी होती कॉन्ट्रोव्हर्शिअल लाइफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः फिल्मी दुनियेतील सर्वात वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सिल्क स्मिताची 23 सप्टेंबर रोजी 20वी पुण्यतिथी होती. 23 सप्टेंबर 1996 रोजी राहत्या घरी सिल्क रहस्यमयरित्या मृतावस्थेत आढळली होती. सिल्क स्मिता दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. आपल्या बोल्ड भूमिकांमुळे तिला सॉफ्ट पोर्न अभिनेत्रीही म्हटले जात होते.

मनाविरुद्ध करावे लागले होते लग्न...
सिल्कचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशातील एल्लुरुमधील एका गरीब कुटुंबात झाला होता. तिचे खरे नाव विजयालक्ष्मी होते. कुटुंबीय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्यामुळे तिचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच होऊ शकले. बालपणापासूनच सिनेमांची आवड असल्यामुळे अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र कमी वयातच तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न करुन देण्यात आले. मात्र जबरदस्तीने केलेल्या लग्नात ती खुश नव्हती. सासरच्या छळाला कटांळून एकेदिवशी सिल्क चेन्नईला पळून गेली. चेन्नईमध्ये ती आपल्या एका काकूसोबत राहू लागली. तिथेच तिने दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

मेकअप आर्टिस्टच्या रुपात करिअरला सुरुवात..
सिल्कने मेकअप आर्टिस्टच्या रुपात आपल्या कामाला सुरुवात केली. शूटिंगदरम्यान अभिनत्रींच्या चेह-यावर टचअप द्यायचे काम सिल्क करु लागली. मेकअप गर्लच्या रुपात काम करत असताना सावळ्या रंगाच्या सिल्कचे ग्लॅमर जगतात स्थान मिळवण्याचे स्वप्न अधिक बळकट झाले. हळूहळू निर्मात्यांबरोबर तिची मैत्री झाली. 1979 मध्ये 'इनाये थेडी' या मल्याळम सिनेमात प्रेक्षकांनी पहिल्यांदा सिल्कला मोठ्या पडद्यावर बघितले.

दहा वर्षांच्या करिअरमध्ये 500 सिनेमांमध्ये काम...
आपल्या उत्तेजक अदांनी सिल्कने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी छाप सोडली. सिल्कला आपल्या सिनेमात कास्ट करण्यासाठी निर्माते आतुर झाले. सिनेमात सिल्कचा कमीत कमी एक तरी आयटम नंबर हवा, असा चित्रपट वितरकांचा हट्ट होता. त्यामुळे आपल्या दहा वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सिल्कने तब्बल पाचशे सिनेमात काम केले.

...आणि विजयाालक्ष्मी बनली 'सिल्क स्मिता'...
'वांडी चक्रम' हा सिल्कच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला. 1980 साली रिलीज झालेल्या या सिनेमातील भूमिकेच्या नावावर तिने आपले नाव 'सिल्क स्मिता' ठेवले. दक्षिणेचे सुपरस्टार कमल हसन, रजनीकांत, चिरंजीवी हे आपल्या सिनेमांमध्ये सिल्कचे एक गाणे असावेच, यावर भर द्यायचे.

बॉलिवूडमध्येही दाखवली जादू...
दक्षिणेसोबतच बॉलिवूडमध्येसुद्धा सिल्कने आपल्या सौंदर्याची जादू चालवली. 'जीत हमारी' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही' आणि 'विजय पथ' या हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केले होते.

जगत होती एकाकी आयुष्य...
एकीकडे सिल्कचे स्टारडम यशोशिखरावर होते, तर दुसरीकडे एकटेपणा तिच्यासोबत होता. एकही प्रेम करणारी व्यक्ती तिच्याकडे नव्हती. त्यामुळे सिल्क दारुच्या आहारी गेली होती. शिवाय निर्माती झाल्यानंतर तिला कोटींच्या घरात तोटा झाला होता. त्यामुळेसुद्धा ती नैराश्येत गेली होती.

रहस्यमयरित्या आढळली मृतावस्थेत..
23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्क तिच्या राहत्या घरी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळी. तिच्या मृत्युमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. सिल्कचा मृत्यू कसा झाला, हे कुणालाही ठाऊक नव्हते. मात्र सिल्कने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, असं म्हटलं जातं.

आयुष्यावर आला सिनेमा...
सिल्कच्या वादग्रस्त आयुष्यावर आधारित 'द डर्टी पिक्चर' हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. अभिनेत्री विद्या बालनने या सिनेमात सिल्कची भूमिका साकारली होती. हा सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिल्कची आठवणीतील छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...