आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांनी केला होता स्मिता पाटीलच्या मृतदेहाचा Makeup, जाणून घ्या बरेच काही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : दीपक सावंत आणि स्मिता पाटील
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटीलने जगाचा निरोप घेऊन 29 वर्षे झालीत. 17 ऑक्टोबर 1955ला पुण्यात जन्मलेल्या स्मिताने 13 डिसेंबर 1986ला चाइल्डबर्थ कॉम्प्लिकेशनमुळे जगाला अलविदा म्हटले होते. स्मिताच्या करिअर आणि पर्सनल आयुष्याविषयी माध्यमांत अनेक गोष्टी आल्या आहेत. तरीदेखील अनेक गोष्टी आहेत, ज्या सामान्य लोकांना ठाऊक नाहीत. स्मिताच्या बर्थडे अॅनिव्हर्सवेळी divyamarathi.comने तिचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट दीपक सावंतसोबत बातचीत केली होती. त्यावेळी त्यांनी स्मिताच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. दीपक यांच्या सांगण्यानुसार,
बाथरुममध्ये केला होता पहिला मेकअप-
दीपक सावंत सांगतात, त्यांनी स्मिता यांचा पहिला मेकअप बाथरुममध्ये केला होता. निमित्त होते 1982च्या 'भीगी पलके' सिनेमाच्या शूटिंगचे. या सिनेमाचे सेट कटक, उडीसामध्ये लावण्यात आला होता. यादरम्यान स्मिताने पहिल्यांदा दीपक यांच्याकडून सल्ला घेतला होता, की तिने मेकअप करावा की नाही? कारण वर्षातून 8-8 सिनेमे एकत्र करत असताना ती कधी-कधी मेकअप करत नव्हती. दीपक यांनी सांगितले, 'मी त्यांना म्हणालो तुम्ही आर्ट सिनेमांत मेकअप करत नाही ते ठिक आहे. मात्र हा कमर्शिअल सिनेमा आहे आणि जर तुम्ही मेकअप केला तर चांगल्या दिसाल.' दीपक यांच्या सांगण्यानुसार, सेटवर लाइट कमी असल्याने मेकअप करू शकत नव्हतो, म्हणून आम्ही स्मिताचा मेकअप बाथरुममध्ये केला.

ते सांगतात, 'बाथरुममध्ये एक लाइट सुरु होता, मी स्मिता यांना म्हणाला आपण इथे मेकअप करू शकतो. त्यांनी याला होकार दिला. आम्ही एका बेसिनवर प्लायवूड टाकून त्यावर एक टॉवेल टाकला आणि त्यावर बसून स्मिता यांचा मेकअप केला. त्यानंतर जेव्हा त्या सेटवर आल्या तेव्हा प्रत्येकजण त्यांच्याकडे बघतच राहिला. सर्वांनी त्याची खूप प्रशंसा केली.' दीपक यांनी यादरम्यान सांगितले, की स्मिताने या मेकअपनंतर दीपक यांना पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून ठेवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अमिताभ बच्चन यांना रागावल्या होत्या स्मिता...
बातम्या आणखी आहेत...