आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन फुटांच्या 'भारती'ला बनायचे होते डॉक्टर, असा मिळाला TV वर ब्रेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायंतनी मनीषाबरोबर जुही परमार. वरच्या फोटोत सनी लियोनी आणि खाली सलमान खानबरोबर जुही. - Divya Marathi
सायंतनी मनीषाबरोबर जुही परमार. वरच्या फोटोत सनी लियोनी आणि खाली सलमान खानबरोबर जुही.
मुंबई - टीव्ही अॅक्ट्रेस जुही असलम सध्या टीव्ही शो 'बढो बहू'मध्ये झळकत आहे. शोमध्ये जुही छोटो बुआच्या रोलमध्ये आहे. तिला ऑडियन्सची पसंतीही मिळत आहे. भारती नावाने प्रसिद्ध असलेल्या केवळ 3.5 फुटांच्या जुहीबाबत अत्यंत कमी लोकांना माहिती आहे की, तिने कधी स्वप्नातही अॅक्ट्रेस बनण्याचा विचार केला नव्हता. पण तिच्या नशिबात तेच होते, त्यामुळे तिला टीव्हीवर ब्रेक मिळाला. 

2010 मध्ये मिळाला पहिला ब्रेक.. 
- जुहीला पहिला अॅक्टींग ब्रेक 2010 मध्ये मिळाला होता. हा शो होता, 'बाबा ऐसो वर ढूंढो'. 
- या शोची कथा भारती चौहान म्हणजे जुहीवर आधारीत होती. ती एका श्रीमंत घराशी संबंधित असते. 
- शो च्या कथेनुसार जुहीची उंची कमी असते. त्यामुळे तिला लग्नासाठी मुलगा मिळत नसतो. 
- त्यामुळे एका गरीब कुटुंबातील लोक त्यांचा मुलगा मुरली लाल म्हणजे, विक्रांत मस्सीचे लग्न पैशासाठी जुहीबरोबर लावून देतात. 
- या शोमुळे जुहीला घराघरात ओळथ मिळाली. प्रेक्षक तिला भारती नावाने ओळखू लागले. 

बनायचे होते डॉक्टर.. 
- आगराजवळच्या शिकोहाबादशी संबंधित जूही सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेत होती. 
- एका मुलाखतीत तिने स्वतः सांगितले होते की, तिला मुळात डॉक्टर बनायचे होते. 
- तिने सांगितले की, कास्टींग कॉर्डिनेटरने मला कॉलेजबाहेर पाहिले होते आणि थेट मला त्याने अॅक्टिंग करणार का असे विचारले होते. 
- मला वाटले तो गंमत करतोय. मला कोणी का स्वतःहून अॅक्टींसाठी विचारेल असा विचार करत मी त्याला टाळले.  
- काही वेळाने कास्टींग कॉर्डिनेटरने मला परत विचारले आणि माझ्या पॅरेंट्सना भेटायचे म्हटले. मी कुटुंबाशी भेट घालून दिल्यानंतर मला ही भूमिका मिळाल्याची खात्री मला पटली. 
- सुरुवातीला माझ्या ईला हे आवडले नाही. पण वडील आणि आजीने मला सपोर्ट केला त्यामुळेच मी अॅक्ट्रेस बनू शकले. 

कमी उंचीमुळे रडायची.. 
- जुही सांगते की, तिला उंची कमी असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. 
- लोक तिला फार विचित्र वागणूक द्यायचे असे जुही सांगते. 
- लोकांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुले अनेकदा जुही रात्रभर रडत बसायची. देवाने आपल्याला इतरांपेक्षा वेगळे का बनवले याचा विचार ती करत असायची. 

वडिलांचे फुटवियर शॉप 
- जुहीच्या वडिलांचे बूट चपलांचे दुकान होते. ती कायम जॉइंट फॅमिलीमध्ये राहिली आहे. 
- अगदी सामान्य कुटुंबांमधून ती आलेली होती. 
- जुही आतापर्यंत 'जोधा-अकबर', 'बढो बहू' सह अनेक शोमध्ये झळकली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जुहीचे इतर काही PHOTOS... 
 
बातम्या आणखी आहेत...