आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर नव्हे हा तरुण आहे दीपिकाचे पहिले प्रेम, या 10 जणीदेखील विसरल्या पहिल्या बॉयफ्रेंडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निहार पंड्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण - Divya Marathi
निहार पंड्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा आज (5 जानेवारी) वाढदिवस असून तिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनय क्षेत्रातील पदार्पणापूर्वी दीपिका मॉडेलिंग क्षेत्रात अॅक्टिव्ह होती. तिने अनेक जाहिरातीत काम केले आहे. मॉडेलिंग करत असताना दीपिका किंगफिशर कॅलेंडर गर्लसुध्दा बनली होती. येथून दीपिकाच्या लोकप्रियतेत भर पडली. जेवढी दीपिकाच्या सिनेमांची चर्चे असते, तेवढीत तिच्या लव्ह-अफेअर्सचीदेखील चर्चा असते. तिच्या आयुष्यात अनेक तरुण येऊन गेलेत. अभिनेता रणवीर सिंहसोबत दीपिका आता रिलेशनशिपमध्ये असून लवकरच दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र रणवीर सिंह पूर्वी अभिनेता रणबीर कपूरसोबत दीपिका रिलेशनशिपमध्ये होती. आणि रणबीर कपूरच दीपिकाच्या आयुष्यात येणारी पहिला व्यक्ती होती, असे सर्वांना माहित आहे. मात्र सत्य काही वेगळेच आहे. रणबीर कपूर नव्हे तर निहार पंड्या याने दीपिकाच्या आयुष्यात पहिली एन्ट्री मारली होती. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर निहारचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानसोबत जुळले होते.

Ex BF निहारने दिल्या दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्यानेही दीपिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळातही तिने मोठे यश संपादन करावे अशी इच्छा त्याने जाहीर केली आहे.
 
खरं तर पैसा प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपल्या पहिल्या प्रियकराला विसरणारी दीपिका एकमेव बॉलिवूड अभिनेत्री नाहीये. अगदी ऐश्वर्या रायपासून ते जॅकलीन फर्नांडिस, अनुष्का शर्मा, आलिया भटसह अनेक अभिनेत्रींना पहिल्या प्रेमाचा विसर पडला आहे.
 
कोण होते बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे पहिले प्रेम, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...