मुंबई - अभिनेत्री दीपिका पादुकोणला रणवीर सिंहसोबत डिनर डेटवर स्पॉट करण्यात आले. दोघेही साऊथ मुंबईच्या एका पॉश नाईट क्लबबाहेर होते. त्यांच्यासोबत क्रिकेटर युवराज सिंगही दिसला. दीपिकाने डिनर डेटवर नाईट सुट घातला होता. तिने ब्लु रंगाचा प्रिंटेट नाईट सुट घातला होता. दीपिकाने केवळ डार्क लाल रंगाची लिपस्टीक लावली होती. दीपिका नाईट सुटवर तर रणवीर सिंह एकदम अप टु डेट दिसत होता. त्याने व्हाईट शर्ट, लाईट ब्लु रंगाचा कोट आणि जीन्स घातली होती. त्याने पोनी बांधली होती. कारमध्ये दिसला युवराज सिंग...
क्रिकेटर युवराज सिंगसुद्धा दीपिका-रणवीरसोबत डिनर डेटवर होता. पण तो कारमध्ये दिसला. दीपिका आणि रणवीर अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. सध्या दोघे संजय लीला भन्साळीच्या पद्मावती चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. दीपिका-रणवीरसह शाहिद कपूरची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, दीपिका-रणवीरचे 5 PHOTOS...