Home | Gossip | Deepika Padukone In Relationship With These Celebs

लांबलचक आहे दीपिकाच्या बॉयफ्रेंड्सची लिस्ट, रणबीर-रणवीरपूर्वी या 5 तरुणांसोबत होते अफेअर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 13, 2017, 12:57 PM IST

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'कॉकटेल' या सिनेमाच्या रिलीजचा पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 13 जुलै 2012 रोजी हा सिनेमा बॉक्स

 • Deepika Padukone In Relationship With These Celebs

  अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'कॉकटेल' या सिनेमाच्या रिलीजचा पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 13 जुलै 2012 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला होता. होमी अदजानिया दिग्दर्शित या सिनेमात दीपिकासोबत सैफ अली खान आणि डायना पेंटी लीड रोलमध्ये होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर समानाधनकारक कामगिरी केली होती. दीपिका तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. फिल्मी करिअरसोबतच तिच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बरीच चर्चा रंगत असते. सिनेमांप्रमाणेच दीपिकाच्या अफेअर्सचीदेखील एक मोठी यादी आहे. मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात करणा-या दीपिकाच्या लव्ह अफेअर्सविषयी जाणून घेऊयात..

  मॉडेलिंगच्या काळात निहार पंड्यासोबत होते अफेअर...
  रिपोर्ट्सनुसार, मॉडेलिंगच्या दिवसांत मॉडेल निहार पंड्यासोबत दीपिका रिलेशनशिपमध्ये होती. 2005 साली एका अॅक्टिंग स्कूलमध्ये दोघांची भेट झाली होती. ही मैत्री लवकरच प्रेमात बदलली. तीन वर्षे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण दीपिकाने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि निहारसोबत ब्रेकअप केले.

  आतापर्यंत या सिनेमांत झळकली आहे दीपिका...
  दीपिकाने 'ओम शांति ओम' (2007), 'बचना ए हसीनों' (2008), 'लव आजकल' (2009), 'हाउसफुल' (2010), 'आरक्षण' (2011), 'रेस 2' (2013), 'चेन्नई एक्स्प्रेस' (2013), 'पीकू' (2015), 'तमाशा' (2015) सह अनेक हिट सिनेमांत काम केले आहे.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, दीपिका पदुकोणच्या बॉयफ्रेंड्सविषयी..

 • Deepika Padukone In Relationship With These Celebs
  उपेन पटेल 

  अभिनेता उपेन पटेल जेव्हा दीपिका पदुकोणच्या संपर्कात आला, तेव्हा ती त्याला पसंत करु लागली. या दोघांच्या लिंकअपची बरीच चर्चा इंडस्ट्रीत झाली होती. दीपिका आणि उपेनचे अफेअर असल्याचे म्हटले गेले होते. 
   
 • Deepika Padukone In Relationship With These Celebs
  सिद्धार्थ माल्या 

  सिद्धार्थ माल्यासोबत दीपिका पदुकोणची मैत्री आणि अफेअर आयपीएलच्या वेळी बघायला मिळाले होते.  बिझनेसमन विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थसोबत बराच काळ दीपिका रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर मात्र दोघांचे ब्रेकअप झाले.  
   
 • Deepika Padukone In Relationship With These Celebs

  मुजम्मिल इब्राहिम


  बातम्यांनुसार, सुपरमॉडेल आणि अभिनेता मुजम्मिल इब्राहिमसोबतदेखील दीपिका पदुकोणचे रिलेशन होते. पण फार कमी काळासाठी हे दोघे सोबत होते.  

 • Deepika Padukone In Relationship With These Celebs
  युवराज सिंह 

  क्रिकेट युवराज सिंहसोबतसुद्धा दीपिकाच्या अफेअरची चर्चा होती. हे नातेदेखील फार काळ टिकले नाही. आयपीएल सामन्यांदरम्यान दीपिका नेहमी स्टेडियममध्ये दिसायची.  
 • Deepika Padukone In Relationship With These Celebs
  रणबीर कपूर 

  रणबीर कपूर आणि दीपिकाचे रिलेशन बराच काळ टिकले होते. 'बचना ऐ हसीनों' (2008) या सिनेमाच्या सेटवर दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. पण तीन वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. एका मुलाखतीत दीपिकाने म्हटले होते, की मीडियामुळे रणबीरसोबतचे तिचे नाते संपुष्टात आले. दीपिका-रणबीरने 'ये जवानी है दीवानी' (2013), 'तमाशा' (2015) या सिनेमांत सोबत काम केले आहे. 
 • Deepika Padukone In Relationship With These Celebs

  रणवीर सिंह 


  दीपिका सध्याच्या काळात अभिनेता रणवीर सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे लग्न करणार असल्याचीसुद्धा चर्चा आहे.  आता हे दोघे आगामी 'पद्मावती' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत.  'रामलीला' (2013) आणि 'बाजीराव मस्तानी' (2015) या सिनेमात ही जोडी एकत्र झळकली. 

Trending