आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2776 Sq. फूटच्या या आलीशान घरात राहते दीपिका, बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अॅक्ट्रेस दीपिका पदुकोण हिने नुकताच तिचा 31 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. 5 जानेवारी, 1986 रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात जन्मलेल्या दीपिकाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. दीपिका बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2016 मध्ये फोर्ब्स मॅगझिनने दीपिकाला पदुकोणला बॉलिवूडची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून सांगितले आहे.  
 
1 जून 2015 ते 1 जून 2016  य़ाकाळात 67 कोटींची कमाई करणा-या दीपिकाने काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील प्रभादेवी परिसरातील Beau Monde टॉवरमध्ये नवीन ऑफिस खरेदी केले आहेत. खास गोष्ट म्हणजे याच 33 मजली टॉवरच्या 26 व्या मजल्यावर दीपिका वास्तव्याला आहे.   

2010 मध्ये खरेदी केले होते घर...
दीपिका निवडक अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचे मुंबईत स्वतःचे घर आहे. 2010 मध्ये तिने प्रभादेवीच्या Beau Monde टॉवरच्या 26व्या मजल्यावर एक अपार्टमेंट खरेदी केले होते. दीपिकचे हे 4 BHK अपार्टमेंट 2776 Sq.Ft मध्ये आहे. 2012 मध्ये आर्किटेक्चरल डाइजेस्ट मॅगझिनच्या पहिल्या अंकासाठी दीपिकाने तिच्या घरात एक स्पेशल फोटोशूट केले होते. यामध्ये दीपिकाच्या लॅव्हिश अपार्टमेंटची झलक बघायला मिळते.  विनीता चैतन्य यांनी दीपिकाच्या या घराचे इंटेरिअर डिझाइन केले आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, दीपिकाच्या आलीशान घराचे Inside Photos...
 
बातम्या आणखी आहेत...