आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REAL LIFEमध्ये एक होणार 'बाजीराव मस्तानी', जाणून घ्या कधी करू शकतात लग्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण - Divya Marathi
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण
मुंबई: पडद्यावरील 'मस्तानी' अर्थातच दीपिका पदुकोण आणि 'बाजीराव' अर्थातच रणवीर सिंह लवकरच लग्न करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपलने आपले नाते पुढे नेण्याचा विचार केला आहे. रिपोर्ट्सनुसार, रणवीर आणि दीपिका ऑस्ट्रियामध्ये रोमँटिक व्हॅकेशनवर जाणार आहेत. त्यावेळी दोघांचे कुटुंबीय त्यांना जॉइन करणार आहेत. इतकेच नव्हे आणखी एका रिपोर्टचे म्हणणे आहे, की पुढच्या वर्षी लग्नगाठीत अडकण्याचा त्यांना विचार आहे. मात्र, अद्याप रणवीर किंवा दीपिकाकडून कोणतेच ऑफिशियल कन्फर्मेशन आलेले नाहीये.
गुपचुप साखरपुडा केल्याची आली होती बातमी...
दीपिका आणि रणवीरने गुपचुप साखरपुडा केल्याच्या बातम्यांनासुध्दा गेल्या काही दिवसांपूर्वी उधाण आले होते. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी सिंह आणि पदुकोण कुटुंबीयांची भेट झाली होती. याचवेळी दोघांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. मेड्रिडमध्ये झालेल्या आयफा अवॉर्ड्स सोहळ्यातसुद्धा रणवीर स्टेजवर परफॉर्म करत असताना दीपिका त्याला फ्लाइंग किस देताना दिसली होती. यापूर्वी मात्र दोघांचे ब्रेकअप झाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणवीर-दीपिकाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...