आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लुंगी डान्स'वर थिरकले डीजल-दीपिका, डीजल म्हणाला - बालपणापासून भारतात यायची होती इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला 'XXX: रिटर्न ऑफ जेंडर केज' हा हॉलिवूड सिनेमा आज भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. रिलीजपूर्वी गुरुवारी मुंबईत या सिनेमाचा शानदार प्रीमिअर सोहळा पार पडला. यावेळी हॉलिवूड अॅक्टर विन डीजलने दीपिका पदुकोणसोबत 'लुंगी डान्स' केला. विशेष म्हणजे यावेळी दोघांनी लुंगी नेसून गाण्यावर ताल धरला होता. प्रीमिअरवेळी दीपिका आणि विन यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधला. विन डीजल म्हणाला, की भारतात येण्याचा अनुभव अतिशय सुंदर आहे. गुरुवारी सकाळी बँड बाजासोबत अस्सल मराठमोळ्या थाटात दीपिकाने विन डीजलचे स्वागत केले. 
 

बालपणापासून होते भारतात यायाचे स्वप्न - विन डीजल 
- विन डीजल गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल झाला. संध्याकाळी त्याने दीपिका आणि सिनेमाचे दिग्दर्शक डीजे करुसोसोबत पत्रकार परिषद घेतली.  
- येथे विन  'XXX: रिटर्न ऑफ जेंडर केज' या सिनेमासोबतच त्याची को-स्टार दीपिकाचे कौतुक करताना दिसला.  
- विनने सांगितले, "बालपणापासूनच माझे भारतात यायचे स्वप्न होते."
- "दीपिका खूप स्पेशल आहे. माझे फेसबुक प्रोफाइल बघून तुम्हाला याचा अंदाज येईलच."
 
म्युझिकल इव्हेंटमध्ये थिरकले डीजल-दीपिका
- प्रीमिअरपूर्वी डीजल आणि दीपिका यांनी एका म्युझिकल इव्हेंटमध्ये सहभाग घेतला.  
- येथे दोघेही चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमातील 'लुंगी डान्स' गाण्यावर ताल धरला. शिवाय दीपिकाने 'काला चश्मा' या गाण्यावरही डान्स केला.  
 

मराठमोळ्या थाटात दीपिकाने केले विनचे स्वागत..
- हॉलिवूड स्टार विन डीजलचे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबईत आगमन झाले. 
- अभिनेत्री दीपिका पदुकोणने अस्सल मराठमोळ्या थाटात एअरपोर्टवर विन डीजलचे स्वागत केले.  
- विनचे मुंबईत आगमन होताच पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने विनचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. दीपिका आणि विन यावेळी मोठ्या आनंदात दिसत होते. 
- महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या महिलांनी टिळा लावून आणि आरती ओवाळून विनचे स्वागत केले. यावेळी हे काय आहे... असा प्रश्न विनने दीपिकाला विचारला.
- तेव्हा टीळा लावणे हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे दीपिकाने विनला सांगितले.

दीपिकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा...
- ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूड सिनेमा आहे. 
- बातम्यांनुसार, तिने या सिनेमात शिकारी आणि प्रेयसीची भूमिका वठवली आहे.
- दीपिका आणि विन यांच्यासह फेमस हॉलिवूड अॅक्ट्रेस नीना डोबरेव आणि रुबी रोज यांच्याही मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. 
- विन डीजल एनएसए एजेंटच्या भूमिकेत आहे.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, थिरकतानाची दीपिका आणि विन डीजलची खास छायाचित्रे...