आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दीवाना\'पासून ते \'फॅन\'पर्यंत, 24 वर्षांत असा बदलत गेला SRKचा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 26 जून 1992 रोजी दीवाना या सिनेमाद्वारे शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. शाहरुखला फिल्म इंडस्ट्रीत येऊन 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमातील 'कोई ना कोई चाहिए...' हे गाणे हिट झाले होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला होता. दीवानापासून ते अलीकडेच रिलीज झालेल्या फॅन या सिनेमापर्यंत शाहरुख वेगवेगळ्या लूक्समध्ये पडद्यावर झळकला. दीवानानंतर याचवर्षा त्याचे चमत्कार, दिल आशना है आणि राजू बन गया जेंटलमेन हे तीन सिनेमे रिलीज झाले होते.

हलाखीच्या परिस्थितीत गेले बालपण
शाहरुख आज बॉलिवूडवर राज्य करतोय, मात्र त्याचा हा प्रवास बराच संघर्षमय होता. शाहरुखने मुंबईत अनेक दिवस संघर्ष केला. 1985 मध्ये दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने जामिया इस्लामिया कॉलेजमधून मास कम्युनिकेशनची पदवी प्राप्त केली. याचकाळात तो थिएटरशीसुद्धा जुळला. शाहरुख केवळ 15 वर्षांचा असताना त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर 1990 मध्ये त्याच्या आईनेसुद्धा या जगाचा कायमचा निरोप घेतला. आईच्या निधनानंतर 1991 मध्ये तो मुंबईत दाखल झाला आणि त्याचा सिनेसृष्टीतील प्रवासाच्या संघर्षाला सुरुवात झाली.

1993 ते 1994 पर्यंत अँटी हीरोची प्रतिमा
शाहरुख आज सिने इंडस्ट्रीत रोमँटिक हीरोच्या रुपात ओळखला जातो. मात्र बॉलिवूड करिअरला सुरुवात केल्यानंतर वर्षभरातच त्याने 'बाजीगर' आणि 'डर' या सिनेमांतून स्वतःला अँटी हीरोच्या रुपात प्रस्थापित केले. दोन्ही सिनेमांतील त्याने साकारलेल्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. 'डर' या सिनेमातून शाहरुखची यशराज फिल्म्समध्ये एन्ट्री झाली जी आजही कायम आहे. 1994 मध्ये शाहरुखचा आणखी एक सिनेमा रिलीज झाला होता, त्याचे नाव होते 'कभी हां कभी ना'. कुंदन शाह यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यानंतर रिलीज झालेल्या 'अंजाम' या सिनेमाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र एसआरकेचा प्रवास कायम राहिला. या सिनेमात साकारलेल्या भूमिकेने शाहरुखला बेस्ट व्हिलनचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिला होता.

1995 मध्ये शाहरुख बनला रोमँटिक हीरो
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अँटी हीरोची भूमिका साकारल्यानंतर शाहरुखसाठी 1995 हे वर्ष खास ठरले. यावर्षी आलेल्या राकेश रोशन यांच्या 'करण अर्जुन' आणि आदित्य चोप्रांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमात शाहरुख झळकला. दोन्ही सिनेमांत एसआरकेने रोमँटिक हीरोच्या रुपात दिसला. हे दोन्ही सिनेमे हिट ठरले. येथूनच निगेटिव्ह शेडच्या भूमिका साकारणा-या शाहरुखला इंडस्ट्रीत रोमँटिक हीरोचा दर्जा मिळाला.

या 24 वर्षांत शाहरुख खानच्या ऑन स्क्रिन लूकमध्ये किती बदल झाले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...