आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्र - हेमा पुन्हा बनणार आजोबा आजी, लग्नानंतर 5 वर्षांनी प्रेग्नेंट झाली ईशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशा देओल आणि भरत तख्तानी, इन्सेट-धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी. - Divya Marathi
ईशा देओल आणि भरत तख्तानी, इन्सेट-धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी.
मुंबई - धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पुन्हा एकदा आजोबा आजी बनणार आहेत. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या रिपोर्टसनुसार ईशा सध्या प्रेग्नंट आहे. मात्र धर्मेद्र-हेमा मालिनीने नव्हे तर राम कमल मुखर्जी यांनी या वृत्तालाल दुजोरा दिला आहे. ते हेमा मालिनीचे दुसरे पुस्तक 'बियाँड द ड्रीम गर्ल'चे लेखक आहे. धर्मेंद्र आणि हेमा दुसऱ्यांदा आजोबा आजी बनणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांची छोटी मुलगी अहाना हिला मुलगा डेरेन झाला होता. 

जून 2012 मध्ये झाले लग्न 
- ईशा देओलने 29 जून, 2012 रोजी उद्योगपती भरत तख्तानी यांच्याशी मुंबईत इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. 
- ईशाला मुलांची खूप आवड आहे. तिची छोटी बहीण आहाना जेव्हा प्रेग्नंट होती, त्यावेळी ईशानेच सर्व तयारी आणि शॉपिंग केले होते. 
- ईशा सध्या हेमा यांच्या जुहू येथील बंगल्यावर राहत आहे. वांद्र्यातील सासरीदेखिलप ती कधी कधी जात असते. 
- वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या या चिमुकल्या पाहुण्यासाठी हेमा यांनी एक खास खोलीही तयार केली आहे. 

चित्रपटांत अपयश 
- ईशाने 2002 मध्ये 'कोई मेरे दिल से पूछे' द्वारे चित्रपट सृष्टीत आगमन केले होते. त्यासाठी तिला फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळाला. पण त्यानंतर तिचे करिअर फारसे चांगले राहिले नाही. एकिकडे हेमा आजही तिच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालते. तर ईशाचे फिल्मी करिअर अवघ्या 25 चित्रपटांतच संपुष्टात आले. 
- यापूर्वी 2015 मध्ये ईशा हिंदी चित्रपट 'किल देम यंग' मध्ये झळकली होती. 

उद्योगपती 'पती'
भरत तख्तानी वांद्र्यातील उद्योगपती आहेत. ते सिंधी कुटुंबात जन्मलेले आहेत. त्यांचे वडील विजय तख्तानीदेखिल मोठे व्यावसायिक आहेत. भरत सध्या नातेवाईकांबरोबर आरजी बंगले प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा. ईशा आणि भरत तख्तानी यांचे आणखी काही PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...