आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेसृष्टीपासून दूर आहेत धर्मेंद्र यांच्या 3 मुली; तिसरी पीढी पदार्पणासाठी सज्ज, अशी आहे फॅमिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे- मुलगी अहानासोबत धर्मेंद्र. उजवीकडे - वर मुली अजीता आणि विजेतासोबत धर्मेंद्र, खाली, सनीसोबत त्याचा मुलगा करण देओल - Divya Marathi
डावीकडे- मुलगी अहानासोबत धर्मेंद्र. उजवीकडे - वर मुली अजीता आणि विजेतासोबत धर्मेंद्र, खाली, सनीसोबत त्याचा मुलगा करण देओल

मुंबईः बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 82 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये जन्मलेले धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये ही मॅन या नावाने प्रसिद्ध आहेत. धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत जेवढे मनमौजी दिसतात, तेवढेच ते खासगी आयुष्यातसुद्धा आहेत. त्यांच्या कुटुंबात दो पत्नी, 4 मुली आणि  2 मुले आहेत. धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील काही सदस्य सिनेसृष्टीत कार्यरत आहेत, तर काही मात्र सिनेसृष्टीपासून दूर आहेत. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि तीन मुली विजेता, अजेता, अहाना कधीच चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीत. 


तिसरी पीढी बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज...
सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. 'पल पल दिल के पास' हा त्याचा डेब्यू चित्रपट आहे. करण धर्मेंद्र यांचा नातू आहे. या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. धर्मेंद्र यांना एकुण सहा नातवंडं आहेत. करण, राजवीर, आर्यमन आणि धरम देओल ही त्यांच्या नातवंडांची नावे आहेत. ही चारही सनी आणि बॉबी यांची मुले आहेत. तर दुसरी पत्नी हेमा आणि धर्मेंद्र यांच्या मुली ईशा-अहाना यासुद्धा आई झाल्या आहेत. डेरिअन हे अहानाच्या मुलाचे तर राध्या हे ईशाच्या मुलीचे नाव आहे.

 

धर्मेंद्र यांचे दोन कुटुंब..
धर्मेंद्र यांचे दोन कुटुंब आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या दोन्ही कुटुंबासोबत धर्मेंद्र यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले आहेत, तर प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. पहिल्या लग्नापासून त्यांना सनी, बॉबी ही दोन मुले आणि विजेता-अजिता या दोन मुली आहेत. हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केल्यानंतरसुद्धा धर्मेंद्र त्यांचे त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत चांगले संबंध आहेत. 


धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन केले हेमा मालिनीसोबत लग्न...
अभिनय क्षेत्राबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे धर्मेंद्र नेहमीच चर्चेत राहिले. पहिले लग्न झाले असतानादेखील धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीबरोबर आपला दुसरा संसार थाटला. हेमा यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी लग्न केले, तेव्हा त्यांची मुलगी लग्नाच्या वयात आली होती. तर मुलगा सनी सिनेसृष्टीत येण्याची तयारी करत होता. पण तरीदेखील त्यांनी 2 मे 1980 रोजी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली असून ईशा आणि अहाना ही त्यांची नावे आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, धर्मेंद्र यांच्या फॅमिली मेंबर्सची छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...