आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 2 पत्नी, 4 मुली आणि 2 मुले, असे आहे बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चे कुटुंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुन डावीकडे - पहिली पत्नी प्रकाश कौर, मुले सनी आणि बॉबी सोबत. (खाली) दुसरी पत्नी हेमा आणि मुली ईशा आणि अहानासोबत अभिनेते धर्मेंद्र.)
मुंबईः बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना अलीकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांत त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रुग्णालयातील ऑर्थोपॅडिक सर्जन संजय देसाई यांनी ही मालिकी दिली.
79 वर्षीय धर्मेंद्र यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. बॉलिवूडमध्ये 'अ‍ॅक्शन किंग' आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणा-या धर्मेंद्र यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी 'शोले' या सिनेमात साकारलेली वीरुची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आपल्या दमदार अभिनयाने धर्मेंद्र यानी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजवलं.
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते. प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना एकुण चार मुले असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. धर्मेंद्र यांना आपल्या पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आणि दोन मुली आहेत. सनी, बॉबी, अजीता आणि विजेता ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. तर दुसरी पत्नी हेमा यांच्यापासून त्यांना दोन मुली आहेत.

सनी आणि बॉबी यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर अजीता आणि विजेता फिल्म इंडस्ट्रीपासून लांब राहिल्या आणि कॅलिफोर्नियात सेटल झाल्या आहेत.
अभिनय क्षेत्राबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे धर्मेंद्र नेहमीच चर्चेत राहिले. पहिले लग्न झाले असतानादेखील धर्मेंद्र यांनी बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीबरोबर आपला दुसरा संसार थाटला. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले, त्यावेळी हेमा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्नापूर्वी एक डझनहून अधिक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. विवाहित आणि चार मुलांचे वडील असूनदेखील धर्मेंद्र यांनी हेमा यांच्या प्रेमाखातर सगळी बंधनं झुगारुन टाकली होती. त्यांनी धर्म परिवर्तन करुन हेमा यांच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे त्याकाळात धर्मेंद्र यांच्या एका मुलीचे लग्न झाले होते, तर थोरला मुलगा सनी सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत होता. हेमा आणि धर्मेंद्र यांना दोन मुली असून ईशा आणि अहाना ही त्यांची नावे आहेत. ईशाने सिनेसृष्टीत काम केले आहे, तर अहाना सिनेसृष्टीकडे वळली नाही.
Divyamarathi.com स्टार परिवार सीरिजअंतर्गत धर्मेंद्र यांच्या कुटुंबाची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...