आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex-Boyfriendने या अॅक्ट्रेससोबत शेअर केला फोटो, अंकिताने लिहिला इमोशनल मेसेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'राबता\' सिनेमाच्या सीनमध्ये सुशांत आणि किर्ती सेनन, दुस-या फोटोमध्ये अंकिता लोखंडे - Divya Marathi
\'राबता\' सिनेमाच्या सीनमध्ये सुशांत आणि किर्ती सेनन, दुस-या फोटोमध्ये अंकिता लोखंडे
मुंबई: दिग्दर्शक दिनेश विजनच्या 'राबता' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि किर्ती सेनन यांची जवळीक कुणापासूनच लपलेली नाहीये. सेटवर दोघांना अनेकदा एकत्र आणि जवळ पाहिल्या गेले आहे. सुशांत आणि किर्ती बॉलिवूडचे नवीन कपल असल्याचे मानले जात आहे. किर्ती आणि सुशांतच्या वाढत्या जवळीकवर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर एक मेसेज शेअर केला आहे. या मेसेजमध्ये तिने कुणाचे नाव लिहिले नाहीये, परंतु हा मेसेज तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे इशारा करते.
इमोशनल मेसेजमध्ये काय लिहिले अंकिताने...
अंकिताने मेसेजमध्ये लिहिले, 'कोणतीही महिला पुरुषाचे पैसे सहज कार रायडिंग आणि मीनू ऑर्डरमध्ये खर्च करू शकते. परंतु महिला तिच असते, जी त्याच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यात त्याची मदत करते. जेव्हा तो खचून गेलेला असतो, तेव्हा त्याला सपोर्ट करते. त्याला धौर्य देऊन त्याला आयुष्यात यश मिळवून देण्यात हातभार लावते. त्याला सतत कॉम्पलीमेंट्स देते आणि जेव्हा तो निशार होतो, तेव्हा दुर्लक्षित करत नाही.'
सुशांत पुन्हा मिळवण्याची अंकिताची ईच्छा...
ऐकिवात आहे, की अंकिता लोखंडेला पुन्हा सुशांत तिच्या आयुष्यात हवा आहे. त्यासाठी तिने दोनवेळा सुशांतशी संपर्क साधला. मात्र त्यांचे बोलणे झाले नाही. असे वाटते, की अंकिता हे नात पुन्हा हव आहे, परंतु सुशांत अंकिताकडे येण्याच्या मनस्थितीत नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुशांतने शेअर केलेला फोटो आणि अंकिताचा मेसेज...