आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Differences Between Abhishek And Aishwarya Because Of The Future Of Daughter Aaradhya

ऐश्वर्या-अभिषेकमध्ये पडली वादाची ठिणगी, भांडणाचे कारण जाणून व्हाल अचंबित!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर कपूरसोबत ऐश्वर्या राय बच्चनने दिलेल्या इंटीमेट सीन्समुळे तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन नाराज झाल्याचे वृत्त गेल्यावर्षी गाजले होते. ऐश्वर्याची बोल्ड भूमिका अभिषेक आणि बच्चन कुटुंबियांना मान्य नव्हती आणि त्यामुळे अॅश-अभिदरम्यान वाद झाल्याची चर्चाही सुरू होती. मात्र त्या दोघांनीही हे वृत्त फेटाळून लावत सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता या दोघांमध्ये पुन्हा खटके उडू लागल्याची चर्चा सुरू असून या वादाचे कारण आहे खुद्द त्यांची मुलगी आराध्या बच्चन.

काय झाले नेमके? 
आराध्या आता 5 वर्षांची असून तिने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे अशी अभिषेकची इच्छा आहे. तिने अभिनय क्षेत्रातील बारकावे शिकून त्यात कौशल्य मिळवावे आणि एक दिवस अतिशय यशस्वी अभिनेत्री बनावे असे अभिषेकचे स्वप्न आहे. पण ऐश्वर्याला मात्र हे पसंत नसून आराध्याने प्रसिद्धीच्या झोतापासून दूर रहावे, असे तिचे मत आहे. मुलीच्या करिअरवरून अॅश-अभिषेकमध्ये वादाची 'ठिणगी' पडल्याचे समजते. मात्र ऐश्वर्या, अभिषेकने किंवा बच्चन कुटुंबियांकडून याप्रकरणी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 
 

'गुरु' सिनेमाच्या प्रीमिअरनंतर अभिषेकने केले होते ऐश्वर्याला प्रपोज...
‘बंटी आणि बबली’ या सिनेमामध्ये ‘कजरा रे’ या गाण्याच्या निमित्ताने एकत्र काम केल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याच जवळीक निर्माण झाली होती. ज्यावेळी या दोघांनीही मणिरत्नम यांच्या ‘गुरु’ सिनेमामध्ये एकत्र काम केले त्यावेळी तर अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबाबत अनेकांनाच माहित झाले होते. गुरु सिनेमाच्या प्रीमिअर नंतरच अभिषेकने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती. या सिनेमाच्या रिलीजला दहा वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. हा सिनेमा 12 जानेवारी 2007 रोजी रिलीज झाला होता. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या लग्नाला दहा वर्षांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे.  

2011 मध्ये झाला मुलगी आराध्याचा जन्म...
16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला. आराध्या बॉलिवूडच्या पॉप्युलर स्टार किड्सपैकी एक आहे. 
 
पुढे बघा, आराध्यासोबतची ऐश्वर्या-अभिषेकची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...