आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी बनले 12 वर्षांचे ऑरो तर कधी परिधान केली साडी, असे आहेत बिग बींचे डिफरंट Looks

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल: 'वजीर', 'लावारिस' आणि 'पा'मधील अमिताभ यांचे लूक. - Divya Marathi
फाइल: 'वजीर', 'लावारिस' आणि 'पा'मधील अमिताभ यांचे लूक.

मुंबईः अमिताभ बच्चन स्टारर 'वजीर' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला आहे. एका मुलाखतीत बिग बींनी सांगितले होते, की 'वजीर'मध्ये पंडीत ओमकार नाथ धार ही व्यक्तिरेखा साकारणे त्यांच्यासाठी एक आव्हान होते. याचे कारण म्हणजे त्यांची ही भूमिका व्हिलचेअरवर बसलेल्या एका बुद्धिबळ खेळाडूची आहे. सिनेमात ते हटके लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचे केस पांढरे झाले असून मिशीसुद्धा वेगळ्या पद्धतीची आहे.
सिनेमात दिसतो हटके अंदाज
आपली भूमिका दमदार बनवण्यासाठी बिग बी आपल्या लूकवर नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. 'पा' (2010) हा सिनेमा असो किंवा 1981 मध्ये आलेला 'लावारिस' हा सिनेमा असो प्रत्येक सिनेमात त्यांचा हटके अंदाज बघायला मिळाला आहे. 'पा'मध्ये त्यांनी प्रोगेरिया आजाराने ग्रस्त 12 वर्षीय ऑरोची भूमिका उत्कृष्टरित्या निभावली होती. या लूकसाठी त्यांना अनेक तास मेकअप करावा लागायचा. तर 'लावारिस' या सिनेमातील 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है...' या गाण्यात ते वेगवेगळ्या रुपात दिसले होते. त्यांनी या गाण्यात साडीदेखील परिधान केली होती.
पडद्यावर बिग बींनी साकारलेल्या वेगवेगळ्या लूक्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...