आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशी दिसायची शिल्पा शेट्टी, बालपणीपासून आतापर्यंत इतका बदलला Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आज 41 वर्षांची झाली आहे. 8 जून 1975 रोजी शिल्पाचा जन्म मंगळोर, कर्नाटक येथे झाला. शिल्पा आज एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच ती यशस्वी बिझनेसवुमनसुद्धा आहे. तिने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली. तेव्हा तिचे वय केवळ 16 वर्षे होते. 1991मध्ये तिने पहिल्यांदा लिम्का ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले होते.
2009मध्ये ती उद्योगपती राज कुंद्रासह लग्न...
शिल्पा शेट्टीने 22 नोव्हेंबर 2009 रोजी लंडनबेस्ड बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. राज कुंद्रा घटस्फोटीत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता होते. कविता आणि राज यांची एक मुलगी असून डेलिना कुंद्रा हे तिचे नाव आहे. शिल्पा आणि राज यांचासुद्धा एक मुलगा असून विवान राज कुंद्रा हे त्याचे नाव आहे.
'बिग ब्रदर'मध्ये वर्णभेदात्मक टीका आणि रिचर्ड गेरचे KISS...
शिल्पा शेट्टीचे आयुष्यातील दोन वाद नेहमीच चर्चेत राहिले आहेत. पहिला वाद म्हणजे 2007 मध्ये ती बिग ब्रदर या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल जेड गुडीने तिच्या वंशभेदात्मक टीका केली होती. शिल्पाने या शोचे विजेतेपद पटकावर भारताचे नाव उंचावले होते. शिल्पाशी निगडीत दुसरा वाद हा 2007मध्ये घडला होता. मुंबईत आयोजित एड्स अवेअरनेस प्रोग्रामवेळी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेर यांनी तिला सार्वजनिक ठिकाणी किस केले होते. त्यावेळी शिल्पाला टीकेला सामोरे जावे लागले होते.
शिल्पा शेट्टी आणि कॉस्मेटिक सर्जरी...
शिल्पा आज बॉलिवूड आणि बिझनेस वर्ल्डमधील सुंदर महिला म्हणून ओळखली जाते. मात्र 90च्या दशकातील आणि 2000नंतरची छायाचित्रे तिचे दोन चेहरे दाखवतात. सांगितले जाते, की सिनेमांमध्ये यशस्वी होण्यासाठी शिल्पाने प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिने एकदा नव्हे तर दोनदा प्लास्टिक सर्जरी करून आपल्या नाकाचा आकार बदलला आहे. परंतु यात कितपत सत्यता आहे शिल्पालाच ठाऊक. असेही म्हटले जाते होते, की प्लास्टिक सर्जरीने शिल्पाचा लूकच नव्हे तर तिच्या बुडत्या करिअरलासुध्दा आधार मिळाला.
जवळजवळ 40 सिनेमांमध्ये केले काम...
शिल्पाने हिंदीव्यतिरिक्त तमिळ, तेलगू आणि कन्नडीमध्ये जवळपास 40 सिनेमे केले आहेत. 1993 मध्ये आलेल्या शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'बाजीगर' सिनेमापासून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून 'आग' हा तिचा पहिला सिनेमा होता. 'धडकन' (2000), 'रिश्ते' (2002) आणि 'फिर मिलेंगे' (2004) यांसारख्या सिनेमांमधील तिच्या अभिनयांची बरीच प्रशंसा झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा शिल्पाची बालपणीपासूनची आतापर्यंतची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...