आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गँगस्टर' ते 'सिमरन' कंगनाने चित्रपटांत लूकवरही केले आहेत अनेक प्रयोग, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - कंगना रनोटच्या करिअरचा विचार करता अगदी बॉलिवूडमध्ये कशाचीही माहिती नसलेली एक तरुणी ते सध्याच्या टॉप अॅक्ट्रेसेसपैकी एक असा तिचा प्रवास राहिलेला आहे. विशेष म्हणजे बंडखोर प्रवृत्तीच्या कंगनाने नेहमीच आपली परखड मते मांडत तिला हव्या त्या अटींवर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिने काही अपवाद वगळता चित्रपटांची निवडही वेगळ्या पद्धतीने केली. 

गँगस्टर चित्रपटापासून सुरू झालेला तिचा प्रवास सिमरनपर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकत्यात रिलीज झालेल्या सिमरन चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवे तसे यश मिळालेले नसल्याचे पाहायला मिळते. पण समीक्षक मात्र या भूमिकेनंतर कंगनाच्या आणखी प्रेमात पडल्याचे जाणवते. चित्रपटात फार काही नसले तरी कंगनाने भूमिकेत प्राण ओतल्याचे म्हटले जात आहे. शक्यतो चित्रपटांमध्ये अॅक्ट्रेसेसचा लूक हा शक्य तेवढा ग्लॅमरस ठेवल्याचे पाहायला मिळते. वेगवेगळे ड्रेसेस आणि ग्लॅमरस स्टाइल असा हिरोईनचा लूक ठरलेला आहे. कंगनाने मात्र तिच्या चित्रपटाच हा पायंडा बदलल्याचे पाहायला मिळते. तिच्या चित्रपटांतील लूक पाहता, कंगनाने स्वतःच्या लूकवरही बिनधास्त प्रयोग केले असल्याचे दिसते. कंगनाचे हेच लूक आपण आज या स्टोरीच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

चला तर मग, कंगनाचे आजवरच्या चित्रपटांतील विविध लूक्स पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर.. 
बातम्या आणखी आहेत...