आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुप्पट वयाच्या हीरोसोबत रोमान्स करणार आहे 'बिग बॉस'ची ही Ex कंटेस्टंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस'ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी लवकरच अभिनेता गोविंदासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दिगांगना  20 वर्षांची तर गोविंदा 53 वर्षांचा आहे. अर्थातच दिगांगना आता तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या हीरोसोबत 'फ्राय डे'  या चित्रपटात रोमान्स करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. सध्या दिल्लीत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. दिगांगना आणि गोविंदासोबत या चित्रपटात वरुण शर्मासुद्धा झळकणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.
 
'एक वीर की अरदास: वीरा' मालिकेतून मिळाली होती प्रसिद्धी...
दिगांगना सूर्यवंशीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख 'एक वीर की अरदास: वीरा' (2013) या मालिकेतून मिळाली होती. दिगांगना अभिनेत्रीसोबत रायटर आणि सिंगरसुद्धा आहे. आतापर्यंत तिचे 'Nixie' आणि 'The Power Of Love' हे दोन नॉव्हेल प्रकाशित झाले आहेत. दिगांगनाचा टीव्ही मालिकांविषयी बोलायचे झाल्यास, तिने 'एक वीर की अरदास वीरा' (2013) व्यतिरिक्त 'क्या हादसा क्या हकीकत' (2002), 'कृष्णा अर्जुन' (2005), 'शकुंतला' (2009), 'बालिका वधु' (2011), 'रुक जाना नहीं' (2011), 'कुबूल है' (2012), 'बॉक्स क्रिकेट लीग' (2014), 'बिग बॉस-9' (2015), 'बॉक्स क्रिकेट लीग-2' (2016) या मालिका आणि टीव्ही शोज केले आहेत. याचवर्षी जुलै महिन्यात दिगांगनाने मुंबईत 3 अँड हाफ BHK घर खरेदी केले असून या घराची किंमत 2 कोटींच्या घरात आहे. या नवीन घरात ती आईवडिलांसोबत वास्तव्याला आहे. 

गोविंदाने यापूर्वी म्हणजे 2008 साली आलेल्या 'मनी है तो हनी' या चित्रपटात हंसिका मोटवानीसोबत रोमान्स केला होता. हंसिका आणि गोविंदा यांच्याही वयात जवळजवळ 20-22 वर्षांचे अंतर आहे. यावर्षी गोविंदाचा 'आ गया हीरो' हा चित्रपट रिलीज झाला होता. पण चित्रपट फ्लॉप ठरला होता. आता 'राजू माइंड ब्लोइंग' आणि 'भगवान के लिए मुझे छोड दो' हे गोविंदाचे आगामी चित्रपट आहे. गोविंदाने  'फ्राय डे' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरचा एक फोटो शेअर केला असून त्यासोबत लिहिले, ‪'It's a Superb feeling working with new generation of Director Filmaker Actors & Technicians ! ‬ #Fryday‬'.

पुढील स्लाईड्सवर बघा, दिगांगना आणि गोविंदाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...