आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरा म्हणाल्या, 'जर दिलीप साहेब हॉलिवूडमध्ये गेले असते, तर माझे काय झाले असते'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप कुमार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांना औक्षण करताना सायरा बानो
रविवारी (13 डिसेंबर) गृहमंत्री राजनाथ सिंहने गतकाळातील अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबई स्थित घरी जाऊन त्यांना पद्मभूषणने गौरवले आहे. यानिमित्तावर त्यांची पत्नी सायरा बानो भावूक झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत खास बातचीत केली. यात बातचीतमध्ये त्यांनी divyamarathi.comसोबत शेअर केलेल्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे, त्यांच्याच तोंडून...
‘आई एम प्राउडेस्ट वाइफ’
दिलीपसाहेबांना अवॉर्ड मिळाल्याच्या आनंदात सायरा यांनी सांगितले, 'मला आज अभिमान वाटतो, की त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. परंतु हिंदुस्तान आणि जगभरातील लोकांनी त्यांना जे प्रेम आणि सन्मान दिला आहे, तोच त्यांच्यासाठी मोठा पुरस्कार आहे.'
भावनिक आणि संवेदनशील आहेत दिलीप कुमार-
पुरस्कार मिळाल्यानंतर दिलीपजींच्या प्रतिक्रियेविषयी सायरा सांगतात, 'त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि त्यांना खूप आनंदी झाला. परंतु ते उघडपणे आपला आनंद व्यक्त करत नाहीत. ते भावूक आणि संवेदनशील आहेत. ते स्वत: जास्त एक्सप्रेस करत नाहीत.'
बॉलिवूडचा इतिहास ‘बिफोर दिलीप कुमार, आफ्टर दिलीप कुमार’

सायरा यांनी सांगितले, की जेव्हा बॉलिवूडचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो ‘बिफोर दिलीप कुमार आफ्टर दिलीप कुमार’ असा असेल. दिलीप साहेब स्वत: एक लेजेंड आहेत.
हॉलिवूडला गेले असते, तर मी नसते?

प्रत्येकाला ठाऊक आहे, की दिलीप साहेब यांना 'लॉरेन्स ऑफ अरेबिया'ची ऑफर मिळाली होती. परंतु क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की हॉलिवूडचा एका प्रसिध्द निर्माता दिलीप कुमार आणि एलिजाबेथ यांना घेऊन 'ताजमहल'सारखा सिनेमा तयार करणार होता. मात्र ते हॉलिवूडमध्ये गेले असते, तर मी कोठुन आले असते, मला तर संधीच मिळाली नसती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची काही छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...