आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात 67 कोटी कमावणारी दीपिका मॉडेलिंगच्या काळात दिसायची अशी, पाहा LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दीपिका पादुकोण जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये 10 व्या क्रमांकाची अभिनेत्री बनली आहे. फोर्ब्स मॅगझिनने जगातील सर्वाधिक फी मिळणा-या आणि कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. त्यात दीपिका पादुकोण दहाव्या स्थानावर आहे. या यादीत स्थखान मिळवणारी दीपिका एकमेव बॉलीवूड अॅक्ट्रेस बनली आहे. तिची कमाई 67 कोटी (1 कोटी डॉलर) एवढी आङे. कमाईचा हा आकडा 1 जून 2015 ते 1 जून 2016 दरम्यानचा आहे.

हॉलीवूड डेब्यूसाठी तयार..
'रेस', 'कॉकटेल', 'चेन्नई एक्ट्रेस', 'गोलियों की रासलीला: रामलीला', 'ये जवानी है दीवानी', 'बाजीराव मस्तानी' सह अनेक सुपरहिट चित्रपट केल्यानंतर दीपिकाने हॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ती विन डीजलच्या 'ट्रिपल एक्स द रिटर्न्स ऑफ जेंडर केज' ची शुटिंग करत आहे. चित्रपटाचा पहिला टिझर रिलीज होत आहे. पुढल्या वर्षी जानेवारीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हॉलीवूडची नेक्स्ट जनरेशन..
या महिन्याच्या सुरुवातीला 'व्हॅनिटी फेयर' या प्रसिद्ध मॅगझिनने दीपिका पादुकोणचा समावेश हॉलीवूडमध्ये आगामी काळात नाव कमावणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये केला होता.

मॉडेलिंगने केली सुरुवात
दीपिका पादुकोण मॉडेलिंगद्वारे चित्रपटांत प्रवेश करून आपले स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कॉलेजच्या दिवसांमध्येच तिने रॅम्प वॉक केला होता. लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का अशा ब्रँड्सची ती अॅम्बेसेडर होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दीपिका पादुकोणचे मॉडेलिंगच्या काळातील काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...