मुंबई - दीपिका पादुकोण ऑगस्ट महिन्याच्या फेमिना मॅगझिनच्या कव्हरवर झळकली आहे. मॅगझिनच्या कव्हरवर झळकणे तसे दीपिकासाठी काही नवीन नाही. पण मॉडेलिंगच्या काळातील दीपिकाचे फोटो पाहिले तर तर दीपिकाच्या लूकमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दीपिकाचा मॉडेलिंगच्या काळात असलेला हा लूक आपण आज पाहणार आहोत.
हॉलीवूड डेब्यू..
'रेस', 'कॉकटेल', 'चेन्नई एक्ट्रेस', 'गोलियों की रासलीला: रामलीला', 'ये जवानी है दीवानी', 'बाजीराव मस्तानी' सह अनेक सुपरहिट चित्रपट केल्यानंतर दीपिकाने हॉलीवूडमध्ये प्रवेश केला. विन डीजलच्या 'ट्रिपल एक्स द रिटर्न्स ऑफ जेंडर केज' मधल्या तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. या चित्रपटाच्या पुढचत्या भागातही ती झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मॉडेलिंगने केली सुरुवात
दीपिका पादुकोण मॉडेलिंगद्वारे चित्रपटांत प्रवेश करून आपले स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कॉलेजच्या दिवसांमध्येच तिने रॅम्प वॉक केला होता. लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का अशा ब्रँड्सची ती अॅम्बेसेडर होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दीपिका पादुकोणचे मॉडेलिंगच्या काळातील काही PHOTOS..