आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका दिग्दर्शकाची लव्हस्टोरी: गर्लफ्रेंडला पळवले होते तेव्हा खिशात होते फक्त 40 रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिग्मांशु धूलिया आणि त्याची पत्नी तुलिका - Divya Marathi
तिग्मांशु धूलिया आणि त्याची पत्नी तुलिका
मुंबई: वय 22 वर्षे, खिशात 40 रुपये आणि चार मित्र. अशा परिस्थितीत दिग्दर्शक तिग्मांशु धूलियाने लव्ह मॅरेज केले होते. त्याला इलाहाबादमध्ये त्याच्या घरासमोर राहणारी तरुणी तुलिकावर प्रेम झाले होते. ती त्याची शाळेतील मैत्रीण होती. तिग्मांशुने आठवीत शिकत असताना तिला प्रपोज केले होते. अनेक वर्षे दोघांच्या भेटीगाठी सुरु होत्या. त्यानंतर तिग्मांशुने अॅक्टिंग कोर्स करण्यासाठी नॅशनल ऑफ ड्रामा (एनएसडी), दिल्लीमध्ये अॅडमिशन घेतले. योगायोगाने तुलिकाच्या वडिलांची बदलीसुद्धा नोएडाला झाली.
पत्राने करत होते प्रेमाच्या गोष्टी...
जवळच्या शहरात राहूनसुध्दा दोघे पत्राने बोलत होते. काही दिवसांनंतर घरच्यांनी तुलिकासाठी मुले शोधण्यास सुरुवात केली. एका मुलासोबत तिच्या लग्नाची बातचीत सुरु होती. दुसरीकडे तिग्मांशुचे घरच्यांनी लग्नाबाबत काहीच विचार केलेला नव्हता. अखेर दोघांनी पळून जाऊन लग्न केले. दोघांनी आर्य मंदिरात लग्न केले. सुरुवातीला घरच्यांनी दोघांचे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. परंतु नंतर मान्य केले. आता दोघे मुंबईत राहतात. तुलिका तिग्मांशुच्या सिनेमांत कॉस्ट्युम डिझाइनिंग आणि प्रॉडक्शनचे काम करते.
मुंबईत एकाच खोलीत राहत होते, पण आनंदी होते...
जेव्हा तिग्मांशु सिनेमांत करिअर करण्यासाठी मुंबईला आला तेव्हा त्याने तुलिकासोबत मुफलिसीमध्ये दिवस घालवले. सात वर्षे त्याचा कोणताच सिनेमा रिलीज झाला नाह. तिग्मांशु सांगतो, 'मी आणि तुलिका एका खोलीत राहत होतो. परंतु कधीच कोणत्या गोष्टीची कमी नव्हती. त्यावेळी आम्ही 10-10 मित्रांना पार्ट्या देत होतो आणि धमालमस्तीत वेळ घालवत होतो.'

नोट: 3 जुलै 1967ला इलाहाबादमध्ये जन्मलेला तिग्मांशु धूलिया 49 वर्षांचा झाला आहे. यानिमित्त divyamarathi.com तुम्हाला त्याची लव्हस्टोरी सांगत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तिग्मांशुचे PHOTOS, हे फोटो इंटरनेटच्या विविध सोर्सच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत....
बातम्या आणखी आहेत...