आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Bharti Was Keen To Marriage Sajid, So As To Put An End To Lot Of Controversies

या कारणामुळे वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारतीने केले होते लग्न, 11 महिन्यांतच झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. फिल्मी करिअरपेक्षा ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. त्यांचे पहिले लग्न अभिनेत्री दिव्या भारतीसोबत झाले होते. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, लग्नाच्या अवघ्या 11 महिन्यांतच दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर साजिद यांनी एका मुलाखतीत उघड केले होते, की त्यांनी खूप घाईत दिव्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला होता. 


गोविंदाने घालून दिली होती साजिद-दिव्याची भेट 
दिव्या भारती वयाच्या 16 वर्षी साजिद नाडियाडवालासोबत पहिल्यांदा भेटली होती. 1990 साली जेव्हा दिव्या गोविंदासोबत फिल्मसिटीत 'शोला और शबनम' या सिनेमाचे शूटिंग करत होते, तेव्हा साजिद त्यांच्या एका मित्रासोबत गोविंदाला भेटायला सेटवर आले होते. हळूहळू दररोज साजिद यांचे सेटवर येणे-जाणे सुरु झाले. एका मुलाखतीत साजिद यांनी सांगितले होते, "15 जानेवारी, 1992 रोजी दिव्याने त्यांना लग्नाची मागणी घातली. को-स्टारसोबतच्या सततच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे दिव्या त्रासली होती. या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी दिव्याला लवकरात लवकर लग्न करायचे होते."

धर्म बदलून गुपचूप थाटले होते लग्न 
20 मे 1992 रोजी हेअर ड्रेसर संध्या आणि तिच्या पतीच्या उपस्थितीत दिव्या आणि साजिद यांचे लग्न झाले होते. साजिद यांच्या वर्सोवास्थित तुलसी अपार्टमेंटमध्ये काजीने त्यांचा निकाह लावला होता. लग्नापूर्वी दिव्याने इस्लाम धर्माचा स्वीकार करुन स्वतःचे नाव सना असे ठेवले होते. मुलाखतीत साजिद म्हणाले होते, "आम्ही लग्नाची गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. कारण दिव्याचे करिअर यशोशिखरावर होते. लग्नाची बातमी समोर आली असती, तर निर्माते घाबरले असते. त्यामुळे मी लग्नाची बातमी जगजाहीर करु दिली नव्हती. दिव्याला मात्र लग्न झाल्याचे सगळ्यांना सांगायचे होते. पण मी तिला असे करु दिले नाही. कदाचित मला त्यावेळी असे करायला नको होते."

गुढ रहस्य बनले दिव्याचा मृत्यू, वाचा पुढील स्लाईड्सवर....
बातम्या आणखी आहेत...