आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: स्वित्झर्लंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे गुलशन कुमारांची सून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून येथे ती मुलगा रुहान आणि पती भूषण कुमारसोबत हॉलिडे एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनचे काही फोटोज दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती मुलासोबत पूलसाइड एन्जॉय करताना दिसत आहे. 
 
टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची दिव्या सून आहे. गुलशन कुमार यांचा मुलगा आणि निर्माता भूषण कुमारसोबत 2005 साली वैष्णो देवी मंदिर (कटरा) मध्ये दिव्या विवाहबद्ध झाली होती. 2011 साली तिने मुलगा रुहानला जन्म दिला. 'यारियां' आणि 'सनम रे' हे सिनेमे तिने दिग्दर्शित केले असून सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टिव आहे. 

मुलगा आणि नव-यासोबत दिसली मस्तीच्या मूडमध्ये...  
दिव्याने इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या मूड्सचे फोटोज शेअर केले आहेत. एका फोटोत तिने मुलाला अलिंगन दिले असून त्या फोटोला कॅप्शन दिले,  'Jaddu ki Jhappi #ruhaankumar 😘'.  तर आणखी एक फोटो शेअर करुन दिव्याने लिहिले, 'The beautiful Swiss country side needs no filter 💛'. 
 
एका फोटोत दिव्या खुर्चीवर उभी असून तिच्यासोबत तिचे पती भूषण कुमार दिसत आहेत. या फोटोला तिने कॅप्शन दिले, 'No matter where ever we travel to in the world the best place to b is in yr arms my love 😌'. आणखी एका फोटो पोस्ट करुन तिने लिहिले,  'Here's a secret fr all u guys out there - We women r lil girls at heart ❤️ We all bcum excited wth lil things 😌✨🤗 #travelstories #switzerland🇨🇭 #happinessishere #'.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, दिव्याने शेअर केलेले तिचे व्हेकेशन फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...