आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Khosla Kumar Is An Indian Actress, Producer And Director

ही आहे दिवंगत गुलशन कुमार यांची ग्लॅमरस सून, 'यारिया'नंतर आता घेऊन येतेय 'सनम रे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिवंगत गुलशन कुमार यांच्या सूनबाई आणि भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमार दिग्दर्शित 'सनम रे' हा सिनेमा येत्या 12 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. 'सनम रे'मध्ये पुलकित सम्राट आणि यामी गौतम मेन लीडमध्ये झळकणार आहेत. या सिनेमातील एक आयटम साँग अलीकडेच रिलीज करण्यात आले असून दिग्दर्शिका दिव्या या गाण्यात ठुमके लावताना दिसत आहे. अक्कड बक्कड... असे बोल असलेल्या या गाण्यात दिव्याचा ग्लॅमरस लूक बघायला मिळतोय.
दिव्याने 2014 मध्ये प्रदर्शित 'यारियां' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. दिव्याच्या पहिल्याच सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावले होते. आता लव्ह स्टोरीवर आधारित 'सनम रे' हा दुसरा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. हा सिनेमा प्रेमकथेवर आधारित असल्याने 12 फेब्रुवारी 2016 रोजी व्हेलेंटाइन डेला सिनेमा रिलीज करण्याचा दिव्याने निर्णय घेतला.
ग्लॅमरस दिव्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हे तर निर्माती आणि अभिनेत्रीसुद्धा आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दिव्याविषयी बरेच काही सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या दिव्याविषयी आणि पाहा तिची ग्लॅमरस छायाचित्रे...