आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांकाची कजिन आहे ही अॅक्ट्रेस, जाणून घ्या कशी बनली होती हृतिकची 'बहीण'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अग्निपथ' सिनेमात कनिका आणि आता अशी दिसू लागली आहे. - Divya Marathi
'अग्निपथ' सिनेमात कनिका आणि आता अशी दिसू लागली आहे.
एंटरटेन्मेंट डेस्क: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 8 जुलैला विवेकसोबत लग्नगाठीत अडकली. तिच्या होमटाऊन भोपाळमध्ये भरपावसात दोघांचे लग्न झाले. भोपाळमधील तरुणी दिव्यांकाने टीव्ही इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच चंदीगढमध्ये जन्मलेल्या विवेक दहियाचे जाट फॅमिलीशी नाते आहे. दिव्यांकाशिवाय तिची कजिन आणि अभिनेत्री कनिका तिवारीसुध्दा भोपाळची मुलगी आहे.
'अग्निपथ'मध्ये हृतिक रोशनच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली दिव्यांकाची कजिन...
2012 मध्ये रिलीज झालेल्या हृतिक रोशन स्टारर 'अग्निपथ' या सिनेमातील त्याची बहीण साक्षीचे पात्र साकारणारी बालकलाकार तुम्हाला आठवतेय का? अगदी निरागस दिसलेली आणि हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, संजय दत्त यांसारख्या बड्या कलाकारांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ही आहे कनिका तिवारी. 'अग्निपथ'द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी कनिका आता साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी कनिकाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
प्रिन्सिपलने दिली होती सिनेमाची परवानगी...
कनिकाचा जन्म 9 मार्च 1996 रोजी झाला. 19 वर्षीय कनिका मुळची मध्यप्रदेशातील भोपाळची रहिवाशी आहे. भोपाळमधील शारदा विद्या मंदिरात दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण झाले. कनिकाला 'अग्निपथ' मिळाला तेव्हा ती 10वी बोर्डाची तयारी करत होती. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, की जर तिच्या प्रिन्सिपलने तिला परवानगी दिली नसती तर ती कदाचित आज या सिनेमात नसती. कनिकाची आई ब्यूटिशिअन असून त्यांचे ब्यूटी पार्लर आहे.
6 हजार स्पर्धकांमधून निवडल्या गेली कनिका...
कनिकाने एका मुलाखतीत सांगितले होते, की 'अग्निपथ'मधील भूमिकेसाठी हृतिक रोशनच्या चेह-याशी साधर्म्य साधणा-या मुलीच्या शोधात दिग्दर्शक होते. यासाठी 6 हजार मुलींच्या ऑडीशन्स घेण्यात आल्या होत्या. शाळेचे ग्रुमिंग टीचर रवींद्र माथूर यांच्या सांगण्यावरुन मी धर्मा प्रॉडक्शनच्या 'अग्निपथ' या सिनेमासाठी ऑडीशन दिली आणि कास्टिंग डायरेक्टर सौरभ सिंह यांनी माझी निवड केली. माझ्या आत्याने धर्मा प्रॉडक्शनची सर्व माहिती काढली. माझ्या आई-वडिलांची इच्छा होती, मी अभिनेत्री व्हावे. म्हणून त्यांनीसुध्दा लगेच होकार दिला. अशाप्रकारे माझ्या अभिनय करिअरला सुरुवात केली. या सिनेमाच्या वेळी कनिका 15 वर्षांची होती.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, दिव्यांकाची कजिन कनिकाचे ग्लॅमरस फोटो...
बातम्या आणखी आहेत...