आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीमध्ये राहताना अॅक्टरने आईला दिले होते बंगला बनवण्याचे वचन, असे केले पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझीपुर - भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव 'निरहुआ' दिवाळी कुटुंबीयांबरोबर साजरी करू शकणार नाही. त्याचे कारण म्हणजे तो एका स्टेज शोसाठी ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे. त्याचे मूळ गाव टंडवामध्ये त्याची आई राहते. गरीबीच्या काळामध्ये मुलाला स्टार बनण्यायोग्य बनवणाऱ्या आईसाठी निरहुआ एक आलिशान बंगला बांधत आहे. त्याच्या आईबरोबर आमच्या प्रतिनिधीने या मुद्द्यावर चर्चा केली. 

90 टक्के काम पूर्ण.. 
- निरहुआचे नीकटवर्तीय ऋषिकेश सांगतात की, बंगल्याचे काम वेगाने सुरू आहे. फक्त फायनल टच-अपसाठी दगड मार्बल असे काही सामान मुंबईहून येणार आहे, त्याच्यासाठी काम थांबलेले आहे. 
- त्याची आई चंद्रज्योती सांगतात, माझा नवरा कोलकाताच्या एका फॅक्टरीमध्ये 4500 रुपयांची नोकरी करायचा. दिनेश आणि त्याचा लहान भाऊ प्रवेशबरोबर आम्ही आगरपाडाच्या झोपडपट्टीमध्ये राहायचो. 
- त्यावेळी आमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. दिनेश म्हणायचा, आई मी तुझ्यासाठी एक दिवस महाल तयार करेल. आज माझा मुलगा ते आश्वासन पूर्ण करत आहे. 
- गावातील लोक या घराचे कौतुक करत असतात. आसपासच्या अनेक गावात असे एकही घर नाही. 

बंगल्याचे वैशिष्ट्य...  
- संपूर्ण घराचे फ्लोरींग मार्बल स्टोनचे असणार आहे. 
- लॉन आणि गार्डनसाठी परदेशी फुलांची झाडे मागवली आहेत. 
- घराच्या इंटेरियर डेकोरेशनचे काम मुंबईच्या डेकोरेटर्सने केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, निरहुआचे ड्रीम हाऊस...
बातम्या आणखी आहेत...