आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Drishyam Actress Ishita Dutta Marries Co Star Vatsal Seth, Sister Tanushree Dutta Misses

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सख्ख्या बहिणीच्या लग्नात पोहोचली नाही तनुश्री दत्ता, बघा लग्नापासून पाठवणीपर्यंतेच PICS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री इशिता दत्ता 28 नोव्हेंबर रोजी अभिनेता वत्सल सेठसोबत विवाहबद्ध झाली. मुंबईतील इस्कॉन टेंपलमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. इशिता ही बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया तनुश्री दत्ता हिची धाकटी बहीण आहे. या लग्नाला मोजकेच लोक निमंत्रित केले गेले होते. त्यात प्रामुख्याने अजय देवगण, काजोल, सोहेल खान, बॉबी देओलसह बॉलिवूड आणि टॉलिवूडचे निवडक स्टार्स सहभागी झाले होते. पण लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे इशिताची सख्खी बहीण तनुश्री दत्ता या लग्नात सहभागी झाली नाही. बहिणीच्या लग्नात तनुश्री सहभागी न झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.  


बहिणीच्या लग्नात का पोहोचली नाही तनुश्री..  
- रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून तनुश्री यात्रा करत आहे. तिच्या एका निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, "तनुश्री आता अध्यात्माकडे वळली आहे. त्यामुळे ती लग्नात येऊ शकली नाही. इशिता तनुश्रीच्या खूप क्लोज आहे. बहिणीच्या लग्नामुळे ती अतिशय आनंदी आहे. पण सध्या तनुश्री अमेरिकेत असून तेथे अध्यात्माचे धडे गिरवत आहे. त्यामुळे ती मुंबईत येऊ शकली नाही."

 

7 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे तनुश्री दत्ता... 
इशिता दत्ताची बहीण तनुश्री गेल्या सात वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटामध्ये बोल्ड दृश्ये देणारी तनुश्री आता पूर्णपणे बदलली आहे. तिचे आताचे फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. आता तनुश्रीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून ती काही दिवस आश्रमामध्येही राहिली होती. सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स हे टायटल 2004 साली जिंकल्यानंतर तनुश्री प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. ‘चॉकलेट’, ‘आशिक बनाया आपने’, ‘डीप डार्क सिक्रेट्स’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘सास बहू और सेन्सेक्स’ यांसारख्या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजाची बरीच चर्चा झाली होती. तनुश्री शेवटची 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘रमा द सेव्हियर’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तीन वर्षे लाइमलाइटपासून दूर राहिलेली तनुश्री 2013 साली एकदम वेगळ्या लूकमध्ये एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसली होती.

 

इशिता दत्ता आणि वत्सल यांची लव्ह स्टोरी 
इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांची लव्ह स्टोरी अगदी फिल्मी आहे. दोघांची भेट 'रिश्तों का सौदागर - बाजीगर' या मालिकेच्या सेटवर झाली होती. येथेच दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले होते. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान इशिता दत्ताची साडी टेबल फॅनमध्ये अडकली होती. वत्सलनेच तिला या अपघातातून वाचवले होते.  

 

'फिरंगी'मध्ये कपिल शर्मासोबत झळकणार आहे इशिता दत्ता...
'दृश्यम' या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी इशिता आता लवकरच कपिल शर्मा स्टारर 'फिरंगी' या चित्रपटात झळकणार आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, इशिता दत्ताचे लग्न आणि पाठवणीचे PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...