आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध Kapoor घराण्यातील सदस्यांचे Educational Qualification वाचून तुम्ही व्हाल शॉक्ड!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 14 जुलै रोजी रिलीज होत आहे. दिग्दर्शक अनुराग बासुच्या या चित्रपटात रणबीरसोबत कतरिना कैफ झळकणार आहे. रणबीर कपूर या इंडस्ट्रीतील सर्वात मोठे घराणे असलेल्या कपूर घराण्यातील आहे. या घराण्यातील एकाहून एक सरस कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण इतक्या मोठ्या घरातील लोकांचे शिक्षण किती हे तुम्ही ऐकले तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 10 वीत रणबीरला मिळाले होते 56 टक्के..
 
रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या घरातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती आहे. मला दहावीत 56 टक्के मिळाले होते. \"मला आई नेहमीच वडिलांचा धाक दाखवुन अभ्यास करायला सांगत असे. मला समाधान वाटते की त्यावेळेस ट्वीटर नव्हते नाहीतर वडिलांनी ट्वीट करुन माझे मार्क्स सगळ्यांना सांगितले असते. रणबीरने सांगितले की जेव्हाही माझा रिझल्ट घ्यायला आई शाळेत येत असे तेव्हा मी आईला पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करेन असे प्रॉमिस करत असे.\" रणबीरने तो घरातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती आहे असे सांगितले आहे. 
 
25 व्या वर्षी रणबीरने केला होता डेब्यू 
रणबीर कपूरने वयाच्या 25 व्या वर्षी \'सांवरिया\' (2007) चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय त्याने \'रॉक स्टार\' (2011), \'वेकअप सिड\' (2009), \'बर्फी\' (2012), \'ये जवानी है दीवानी\' (2013), \'तमाशा\' (2015) यांसारख्या इतर चित्रपटातही काम केले आहे. 
 
करिश्मा कपूर 
करिश्मा केवळ 5वी शिकलेली आहे. शाळेत असतानाच तिने अभ्यास सोडून दिला आणि चित्रपटात करिअर करण्याचे स्वप्न पाहू लागली. करिश्माने वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटातून डेब्यू केला होता. \'प्रेम कैदी\' (1991) हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तिने \'जिगर\' (1992), \'राजा बाबू\' (1994), \'अंदाज अपना अपना\' (1994), \'सुहाग\' (1994), \'रिश्ते\' (2002), \'जुबैदा\' (2001) यांसारख्या चित्रपटात काम केले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कपूर घराण्यात कोणाचे झाले किती शिक्षण..
बातम्या आणखी आहेत...