आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भल्लालदेव' आहे इंडस्ट्रीअल फोटोग्राफीत पारंगत, वाचा किती शिकले आहेत 'बाहुबली 2'चे स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली-2' हा सिनेमा कमाईचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर आता ‘बाहुबली 2’ या सिनेमाने एका आठवड्यात सर्वाधिक कमाईचा रेकॉर्डही आपल्या नावावर नोंदवला आहे. पहिल्या आठवड्यात ‘बाहुबली 2’ ने 860 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात  860 कोटी रुपयांची कमाई करणारा हा एकुलता एक भारतीय सिनेमा ठरला आहे. हिंदी भाषेतील आवृत्तीने 500 कोटी रुपयांचा वाटा उचलला आहे. सिनेमाला मिळालेल्या यशामुळे संपूर्ण टीम सध्या भलतीच खुशीत आहे. कष्टाचे चीज झाल्याची भावना सर्व कलाकार व्यक्त करत आहेत. 
 
दिग्दर्शक एस.एस.राजामौली, प्रभास, अनुष्का शेट्टी, राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, सत्यराज, राणा डग्गुबत्तीसह संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत पडद्यावर दिसतेय. सिनेरसिकांचे फेव्हरेट बनलेल्या या स्टार्सच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत. या पॅकेजमधून बाहुबली 2चे कलाकार किती शिकले आहेत, याची खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

इंडस्ट्रीअल फोटोग्राफीत पारंगत आहे भल्लालदेव... 
बाहुबलीमध्ये भल्लालदेव ही निगेटिव्ह भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबत्ती उच्चशिक्षित आहे. त्याने इंडस्ट्रीअल फोटोग्राफी या विषयात पदवीप्राप्त केली आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने अॅड फिल्म्स आणि डॉक्युमेंट्रीज तयार केल्या होत्या. राणाचे वडील सुरेश बाबू हे तेलगु सिनेमांचे निर्माते होते, तर आजोबा डी. रामानायडू हेदेखील निर्माते होते. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते. 

प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटियासह किती शिकले आहेत बाहुबलीचे स्टार्स , हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...