आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 व्या वर्षीही अविवाहित आहे एकता कपूर, या कारणामुळे करायचे नाही लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वयाची 42 वर्षे पूर्ण केलेल्या एकता कपूरने अद्याप लग्न का केले नाही? या प्रश्नाचे उत्तर तिने एका मुलाखतीत दिले होते. त्यावेळी एकताला विचारण्यात आले होते की, तिचा भाऊ तुषार आणि बेस्ट फ्रेंड करण जोहर वडील (सेरोगेसी द्वारे ) बनले आहेत. तुला पॅरेंट बनण्याची इच्छा होत नाही का? एकता म्हणाली होती, माझ्या पॅरेंट्सनाही तसे वाटते. पण असे कधी शक्य होईल माहिती नाही. मी सध्या फार बिझी आहे. 

आणखी काय म्हणाली होती एकता.. 
- एकताने मुलाखतीत म्हटले होते, मी त्या महिलांचा सन्मान करते ज्या कामाबरोबर घरही मॅनेज करतात. 
- मला मुलाच्या प्लानिंगआधी आयुष्याचे प्लानिंग करण्याची गरज आहे. 

लग्नाबाबत म्हणाली.. 
- एकताच्या मते, तिच्या जेवढ्या मित्रांनी लग्न केले होते, ते सर्व आता अविवाहित आहेत. गेल्या काही दिवसांत मी फार घटस्फोट पाहिले आहेत. मला वाटते माझ्यात खूप संयम आहे, कारण मी अजूनही सर्वाची वाट पाहत आहे, असे ती म्हणाली. 
- मला एक गोष्ट माहिती आहे की, मला बाळ पाहिजे पण लग्न करायचे नाही. माहिती नाही का, पण माझ्याकडे स्वतःसाठी वेळ नाही. काही तासांचा वेळ मिळालाच तर मला स्पामध्ये जायला आवडेल. 
- एकता कपूर टीव्हीवरील सर्वात यशस्वी निर्माती आहे. सध्या तिचे 'कसम तेरे प्यार की', 'चंद्रकांता', 'ये है मोहब्बते', 'चंद्रनंदिनी', 'ढाई किलो प्रेम', 'परदेस मे है मेरा दिल' आणि 'कुमकुम भाग्य' असे अनेक सो टीव्हीवर सुरू आहेत. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही टीव्ही अॅक्ट्रेसेस ज्यांनी वयाची 35 आणि 40 ओलांडूनही अद्याप लग्न केलेले नाही.. 
बातम्या आणखी आहेत...