आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Emraan Hashmi Ileana DCruz Esha Gupta Interview With Dainikbhaskar.Com, Film Baadshaho

शूटिंगवेळी खरोखरच तुरुंगात झाले होते या सीनचे शूटींग, इलियानाला झाल्या होत्या उलट्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्दर्शक मिलन लुथरीया यांचा चित्रपट 'बादशाहो' रिलीज झाला आहे. हा एक ड्रामा फिल्म आहे ज्यात अजय देवगण, इमरान हाश्मी, इलियाना डिक्रुज आणि ईशा गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग राजस्थानमध्ये झाले आहे. चित्रपटाची स्टारकास्ट इमरान, इलियाना आणि ईशाने या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल काही अनुभव सांगितले आहेत. जोधपुरच्या जेलमध्ये झाले होते खरेखुरे शूटींग..
 
चित्रपटात इलियाना डिक्रुजने राणीची भूमिका केली आहे. या चित्रपटात एका सीनमध्ये इलियानाला जेलमध्ये बंद दाखवण्यात आले होते. यावेळी शूटिंग करताना तिचा अनुभव फार भयानक होता. तिने सांगितले की, जेथे शूटिंग झाले ते एक खरेखुरे जेल होते आणि तिथए इतका घाणेरडा वास होता की बस्स. मला उलट्या होण्यास सुरुवात झाली होती. जिथे शूट करण्यात आले होते तिथे मला थोड्या वेळातच अस्वस्थ होण्यास सुरुवात झाली होती. मी विचार करत होते की येथील कैदी कसे राहत असतील. हा विचार करुनच माझ्या अंगावर काटा आला. 
बातम्या आणखी आहेत...