आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन बहू ऐश्वर्या, करीना, मान्यतासह या अभिनेत्रींचा गरोदरपणात दिसला स्टायलिश LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशा देओल, मान्यता दत्त आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे गरोदरपणातील फोटो - Divya Marathi
ईशा देओल, मान्यता दत्त आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे गरोदरपणातील फोटो
 
गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. शाहिद कपूर-मीरा राजपूत, करीना कपूर खान-सैफ अली खान, शब्बीर अहलुवालिया-कांची कौर, गीता बसरा-हरभजन सिंग या सेलिब्रिटींच्या घरी गोंडस बाळांनी जन्म घेतला. यावर्षीही अनेक बॉलिवूडकरांच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे.
 
नुकतेच मॉडेल अभिनेत्री लिसा हेडनने गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा सोहा अली खान आणि ईशा देओल यांच्याकडे लागल्या आहेत. सोहा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असल्यामुळे तिचे नवनवीन फोटो तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतात. पण ईशाचे मात्र तसे नाही. सिनेसृष्टीपासून दूर झाल्यावर ती फारशी प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. पण अलीकडेच तिच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर तिचा आणि ईशाचा गरोदरपणातला फोटो शेअर केला आहे. हिवाळ्यामध्ये ईशाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होईल असे म्हटले जात आहे. 
 
सोहा आणि ईशा प्रेग्नेंसीच्या काळात अतिशय सिंपल लूकमध्ये दिसत आहेत. पण ऐश्वर्या राय बच्चन, करिश्मा कपूर, करीना कपूर-खान शिल्पा शेट्टी, ट्विंकल खन्ना, अमृता अरोरा या अभिनेत्री प्रेग्नेंसीच्या काळात अनेकदा स्टायलिश आऊटफिट्समध्ये सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसल्या. काहींनी साडीत तर काहींनी शॉर्ट ड्रेसमध्ये याकाळात पब्लिक अपिअरन्स दिला होता. या सर्व अभिनेत्रींच्या चेह-यावर आई होण्याचा आनंद स्पष्ट दिसला. विशेष म्हणजे प्रेग्नेंसीच्या काळात लठ्ठ झालेल्या या सर्व अभिनेत्रींनी बाळाच्या जन्मानंतर काही काळातच स्वतःला फिट करुन आपले वाढलेले वजनदेखील कमी केले. 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रेग्नेंसीच्या काळात या अभिनेत्री कशा दिसल्या हे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉलिवूड अभिनेत्रींची प्रेग्नेंसीच्या काळातील झलक...
बातम्या आणखी आहेत...