आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद-हेमा यांची गर्भवती मुलगी पती-दीरांसोबत करतेय एन्जॉय, शेअर केला PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची थोरली लेक ईशा देओल सध्या प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. ईशाला सहावा महिना सुरु आहे. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांचे हे पहिले बाळ आहे. नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहुल लागल्यापासून तख्तानी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ईशाने तिच्या पती आणि सहा दीरांसोबतचा एक खास फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ईशाने फोटोला कॅप्शन दिले, "satte pe satta " that's exactly how we are!Rakhi with my lovely Takhtani brothers ...I'm in bhabi mode to Bharat's younger brothers !!!"

काही दिवसांपूर्वी ईशा आणि भरत बेबीमून सेलिब्रेट करण्यासाठी ग्रीसला गेले होते. येथे त्यांनी मॅटर्निटी फोटोशूटदेखील केले होते. या फोटोशूटचे काही फोटो ईशाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होतेय या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
 
लग्नानंतर पाच वर्षांनी प्रेग्नेंट..
ईशा लग्नानंतर पाच वर्षांनंतर प्रेग्नेंट आहे. 29 जून, 2012 ला बिझनेसमन भरत तख्तानीबरोबर तिने मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. तिच्या प्रेग्नेंसीची बातमी एप्रिल 2017 मध्ये आली होती. धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी दुसऱ्यांचा आजोबा-आजी बनणार आहेत. यापूर्वी त्यांची छोटी मुलगी आहानाला मुलगा (डेरेन) झाला आहे.
 
ईशाला आवडतात लहान मुले..
ईशाला मुले खूप आवडतात. जेव्हा हेमा यांची छोटी मुलगी आहाना प्रेग्नेंट होती, तेव्हाही ईशाने खूप प्लानिंग आणि शॉपिंग केले होते. या वर्षाच्या अखेरीस घरात येणाऱ्या या नवीन पाहुण्यासाठी हेमा मालिनी यांनी घरात एक खास रूम तयार केली आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, ईशाचे प्रेग्नेंसीच्या काळातील खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...