आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्र-हेमा यांच्या लेकीचे मॅटर्निटी फोटोशूट, नव-यासोबत दिसला Stunning लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची थोरली लेक ईशा देओल सध्या प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. ईशाला सहावा महिना सुरु असून तिने खास मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे ग्रीसमध्ये ईशा आणि भरत यांनी हे फोटोशूट केले. लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे बेबीमूनसाठी दोघे ग्रीसला गेले होते. या फोटोशूटचे काही फोटो ईशाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. 

सकाळी 6 वाजता केले फोटोशूट...   
सकाळी 6 च्या सुमारास हे फोटोशूट झाले आहे. या अनुभवाबद्दल सांगताना ईशा म्हणाली, ‘मला समुद्रकिनारा खूप आवडतो. ग्रीसमध्ये भरतसोबत फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरलाय. मला घरच्या जेवणाची खूप आठवण आली, मात्र भरतला इथले सागरी खाद्यपदार्थ खूप आवडले.’  

लग्नानंतर पाच वर्षांनी प्रेग्नेंट..
ईशा लग्नानंतर पाच वर्षांनंतर प्रेग्नेंट आहे. 29 जून, 2012 ला बिझनेसमन भरत तख्तानीबरोबर तिने मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. तिच्या प्रेग्नेंसीची बातमी एप्रिल 2017 मध्ये आली होती. धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी दुसऱ्यांचा आजोबा-आजी बनणार आहेत. यापूर्वी त्यांची छोटी मुलगी आहानाला मुलगा (डेरेन) झाला आहे.

ईशाला आवडतात लहान मुले..
ईशाला मुले खूप आवडतात. जेव्हा हेमा यांची छोटी मुलगी आहाना प्रेग्नेंट होती, तेव्हाही ईशाने खूप प्लानिंग आणि शॉपिंग केले होते. या वर्षाच्या अखेरीस घरात येणाऱ्या या नवीन पाहुण्यासाठी हेमा मालिनी यांनी घरात एक खास रूम तयार केली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रेग्नेंट ईशा देओलचे मॅटर्निटी फोटोशूट आणि इतर काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...