आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करिश्माला दुस-या व्यक्तीसोबत पाहून भडकला Ex-Husband, सर्वांसमोर ओरडला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय कपूर आणि करिश्मा कपूर - Divya Marathi
संजय कपूर आणि करिश्मा कपूर
मुंबई: करिश्मा कपूर आणि बिझनेसमन संजय कपूरचा घटस्फोट झाला आहे. परंतु संजयला पूर्वाश्रमीची पत्नी करिश्मा दुस-या व्यक्तीसोबत फिरलेली आजही आवडत नाही. सूत्रांच्या सांगण्यानुसार, काही आठवड्यांपूर्वी संजय काही मित्रांसोबत लंडनमध्ये डिनर करत होता. परंतु त्यावेळी करिश्मासुध्दा त्यात रेस्तरॉमध्ये कथित बॉयफ्रेंड संदीप तोषनीवालसोबत आली. करिश्माचे असे वागणे खटकले.
सर्वासमोर करिश्मावर ओरडला संजय...
रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कथित बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर संजय तिच्यावर सर्वांसमोर ओरडला आणि हंगामा करू लागला होता. मात्र, संजयच्या मित्राने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला करिश्मा आणि तुझा घटस्फोट झाला आहे. म्हणून तू शांत राहा. या संपूर्ण घटनेवर करिश्मा किंवा संजयकडून कोणतेच ऑफिशिअल स्टेटमेंट आले नाहीये.
जूनमध्ये झाला घटस्फोट...
संजय आणि करिश्माच्या घटस्फोटाला जून महिन्यात मंजूरी मिळाली. 2014मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात अनेक वळणे आली. हे प्रकरण मुलांच्या कस्टडीमुळे अडकले होते. त्या मुद्यावर एप्रिल महिन्यात सामंजस्याने सोडवणूक करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने आपसातील सहमतीनंतर दोघे वेगळे झाले आणि मुलांची कस्टडी करिश्माला देण्यात आली. जूनमध्ये मुंबईच्या एका फॅमिली कोर्टाने त्यांना कायदेशीरित्या घटस्फोट मिळाला. करिश्मा आणि संजयचे लग्न 29 सप्टेंबर 2003ला झाले होते आणि 2012पासून ते वेगळे राहत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करिश्मा-संजयचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...