कोलकाता लिटरेचरमध्ये सामील होण्यासाठी पोहोचलेले शत्रुघ्न सिन्हाने एका मुलाखतीत आपल्या पर्सनल लाइफविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. यादरम्यान 'एनिथिंग बट खामोश' या बायोग्राफीविषयी बोलताना त्यांनी सांगितले, की त्यांच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या. परंतु याविषयी त्यांनी पुस्तकात काहीच लिहिले नाही.
लग्नानंतर रीनासोबत जुळले होते नाव...
शत्रुघ्नने पुस्तकात आपली को-स्टार रीना रायसोबतच्या ऑफ-स्क्रिन रिलेशनविषयीसुध्दा लिहिले आहे. पूनम चंडीरामणी (आता सिन्हा)सोबत लग्न झाल्यानंतर काही काळ रीना रायसोबत शत्रुघ्न यांचे नाते तसेच होते जसे लग्नापूर्वी होते. रीना रायसोबत 'नसीब', 'मुकाबला' आणि 'कालीचरण'सारख्या सिनेमांत काम करणा-या शत्रुघ्न यांचे रीनासोबत सात वर्षे नाते होते. विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांची पत्नी पूनमला यांच्या नात्याविषयी सर्वकाही ठाऊक होते. शत्रुघ्नसह अनेक सेलेब्स आहेत, ज्यांच्या विवाहबाह्य संबंधांनी खूप चर्चा एकवटली...
अधूरी राहिली रेखा-अमिताभची लव्हस्टोरी...
रेखासोबत अमिताभ यांचे लिंक-अप जया यांच्यासोबत लग्न झाल्यावर झाले. 1973मध्ये जया यांच्यासोबत लग्न केल्यानंतर काही वर्षांनंतरच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. सांगितले जाते, की 1976मध्ये 'दो अनजाने' सिनेमाच्या शूटिंगवेळी अमिताभ आणि रेखा यांची जवळीक वाढली होती. 1981मध्ये यश चोप्राने जया-अमिताभ-रेखा यांच्या नात्यावर 'सिलसिला' सिनेमा तयार केला होता. या सिनेमात अमिताभ-जया-रेखा एकत्र दिसले होते. तेव्हापासून आतापर्यंत हे स्टार्स कधीच ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन एकत्र आले नाहीत. रेखा आजही अनेक इव्हेंट्स आणि कार्यक्रमात भांगात कुंकु लावून जातात. परंतु हे कुंकु कुणाच्या नावाचे आहे हे अद्याप कुणाला कळालेले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूडच्या अशाच काही विवाहबाह्य संबंधांविषयी...