आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज अॅक्ट्रेसला Kiss पाठवायचा हा वादग्रस्त अॅक्टर, जगतो अशी Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वतःला नंबर वन क्रिटिक आणि ट्रेड अॅनालिस्ट सांगणारा कमाल आर खान (केआरके) नेहमीच कोणत्या तरी विषयावरुन वादात सापडत असतो. नुकतेच त्याला मराठमोळ्या श्रेयस तळपदेने चांगलेचत सुनावले आहे. 'औकात मे रह' असे सांगत श्रेयसने त्याची बोलती बंद केली. श्रेयसच्या पोस्टर बॉइज चित्रपटाबाबत आणि स्टारडमबाबत केआरकेने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर श्रेयसने त्याला फटकारले आहे. अनेकदा विवादित वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेल्या कमालची संपूर्ण लाईफ अत्यंत इंटरेस्टिंग आहे. त्याच्या सांगण्यानुसार तो हॉलंडहून आलेले दूध आणि चहा पावडर लंडनहून आलेली वापरतो. 

कमालच्या लाईफशी संबंधित काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स ....
- केआरकेचे खरे नाव राशिद खान असे आहे. त्याने त्याच्या नावापुढे 'कमाल' नंतर जोडले आहे.
- केआरकेने हीरो बनण्यासाठी घर सोडले होते. 2005 मध्ये पडद्यावर आलेल्या 'सितम' या सिनेमापासून प्रोड्यूसर म्हणून कमालने त्याच्या करिअरला सूरुवात केली. 
- यानंतर त्याने लोबजेट असलेल्या बऱ्याच भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम केले.
- त्याने ट्विटरवर एका अॅक्ट्रेसला प्रपोज करून ब्रेकअपही केले आहे. 
- केआरकेने टीवी अॅक्ट्रेस सारा खानला ट्विटरवर प्रपोज केले होते.
- या आधी केआरके फिल्म अभिनेत्री असिनला रोज सकाळी 'किस' पाठवण्यावरून चर्चेत आला होता.
- त्याने ट्विटरवरच ब्रेकअपही केले आहे. एका ट्विटमध्ये कमालने, 'आता मी खऱ्या अर्थाने गर्लफ्रेंड सबाहपासून वेगळा झालो आहे', मी आता टीव्ही अॅक्ट्रेस सारा खानच्या प्रेमात पडलो आहे." असे लिहिले होते.
- केआरकेने दावा केला आहे की, तो 21 हजार स्क्वेअर फूटांच्या बंगल्यात राहतो. त्याने सांगितल्यानुसार तो हॉलंडहून दूध मागवतो, फ्रांसहून पानी आणि लंडनहून चाहाची पावडर मागवतो.
- त्याच्या या वक्तव्याची सोशलमिडियावर जबरदस्त खल्लीही उडवण्यात आली होती. 
- तो आता गारमेंट चा बिझनेस करतो. एवढेच नाही तर आखाती देशांत मजूर पाठवण्याचाही त्याचा बिझनेस आहे. चित्रपटांवर टीका करून त्याचे व्हिडीओही तो पोस्ट करत असतो. 
- कमालचे वर्सोवा येथे ऑफिस आहे. त्याच्या घराचा समोरचा भाग काचाचा बनलेला आहे. त्यावर मोठया अक्षरात R लिहिले आहे. 
- केआरकेचा एक बंगला दुबईत असून त्याचे नाव जन्नत असे आहे. 
- त्याच्या घरातील लिव्हिंग रुम, कॉरिडोर आणि जीमच्या भिंतींवर मोठमोठे फोटोज लावलेले दिसतात.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, केआरकेचे काही इंट्रेस्टिंग PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...