आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मॉडेल आहे नागपूरची, 23व्या वर्षी ठेवले होते शारीरिक संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकिता गोखले. या नावाला आता वेगळ्या परिचयाची गरज राहिलेली नाही. प्लेबॉय या आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी केलेले न्यूड फोटोशूट असो वा ‘मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल 2015’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणे असो, निकिता आज एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. अलीकडेच निकिता बालपणी तिचे लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा करुन चर्चेत आली आहे. निकिता नेहमीच आपल्या बोल्ड फोटोशूट आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. नववीत शिकत असताना ट्युशन टीजरने आपले शोषण केल्याचा मोठा खुलासा तिने केला.

निकिता अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आहे. आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला निकिताच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याविषयीच्या काही खास गोष्टी सांगत आहोत.
नागपूरजवळील तुमसर या छोट्याशा गावात जन्म
निकिता मुळची विदर्भातील आहे. नागपूर जवळच्या तुमसर या छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ती नागपुरात आली. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून असलेल्या निकिताची पहिली कमाई ही ४०० रुपये होती. मात्र आपल्या इच्छाशक्ति आणि आत्मविश्वासाच्या बळावर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली. निकिताला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तिचे वडील स्टील वर्कशॉपमध्ये कामला होते. नागपूरच्या जीएस कॉलेजची विद्यार्थिनी राहिलेल्या निकिताने अनेक जाहिरातींसाठी मॉडेलिंग केले आहे.
पुढे वाचा, निकिता नव्हे दुर्गा आहे खरे नाव...
बातम्या आणखी आहेत...